Old Cooler best Price eSakal
विज्ञान-तंत्र

Old Cooler best Price : नवीन कूलर घेताय? जुन्या कूलरला भंगारात नका देऊ; 'या' ठिकाणी मिळेल बेस्ट प्राईज

Old Cooler : तुमच्या जुन्या कूलरची बॉडी अगदीच खराब झाली असेल, तर त्याला विकून टाकणंच चांगला पर्याय आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

Sudesh

Sell Old Cooler online : उन्हाळा सुरु झाल्यानंतर कित्येक घरांमध्ये नवीन कूलर किंवा एसी येतो. अशा वेळी जुन्या कूलरला बरेच लोक थेट भंगारात देऊन मोकळे होतात. तुम्हीदेखील जुना कूलर फेकून देण्याच्या विचारात असाल, तर थोडं थांबा. कारण आजकाल काही वेबसाईट्वर तुम्हाला याच कूलरची चांगली किंमत मिळू शकते.

तुमच्या जुन्या कूलरची बॉडी अगदीच खराब झाली असेल, तर त्याला विकून टाकणंच चांगला पर्याय आहे. या माध्यमातून मिळालेली रक्कम तुम्हाला नवीन कूलर किंवा एसी घेण्यासाठी देखील फायद्याची ठरते. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

ओएलएक्स

तुमचा जुना कूलर जर काही प्रमाणात काम करत असेल, तर त्याला OLX वेबासाईटवर विकू शकता. यासाठी तुम्हाला कूलरचे चांगले फोटो काढून या वेबसाईटवर अपलोड करावे लागतील. तसंच त्याची अपेक्षित किंमतही सांगावी लागते. यानंतर ज्या व्यक्तीला हा कूलर घ्यायचा असेल, ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल.

तुमचा कूलर जर आजिबातच काम करत नसेल, तर त्यासाठी देखील एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. स्क्रॅप अंकल या वेबसाईटवर तुम्ही आपल्या कूलरची माहिती देऊ शकता. याठिकाणी देखील तुम्हाला जुन्या कूलरची चांगली किंमत मिळेल.

जुन्या कूलरमधील पार्ट्स

जुन्या कूलरला विकण्यापूर्वी त्यातील पार्ट्स तपासून घेणं गरजेचं आहे. यातील फॅनची मोटर, पाणी सप्लाय करण्याची मोटर, कडेन्सर असे कित्येक पार्ट्स तुम्ही वेगळे काढून विकू शकता. याचाही तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT