China's uncrewed reusable spacecraft esakal
विज्ञान-तंत्र

China Secret Spacecraft : चीनने अंतराळात सोडलेल्या 'सिक्रेट' वस्तूमुळे जग चिंतेत; नेमकं काय आहे प्रकरण?

China Secret Spacecraft Tension : चीनने जूनमध्ये यानातून एका रहस्यमय वस्तूला अवकाशात सोडले. त्यानंतर हे यान काही किलोमीटर दूर गेले आणि नंतर पुन्हा त्या वस्तूजवळ आले. या वस्तुचे काय काम आहे हे देखील अद्याप कळालेले नाही.

Saisimran Ghashi

China Space Mission Global Tension : चीनने त्यांच्या सीक्रेट अंतराळ यानाचे जूनमध्ये यशस्वी उड्डाण केले आहे. या यानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून जगभरातील देशांना याबाबत गंभीर चिंता वाटत आहे. या यानाचे काय काम आहे हे अद्यापही कोणीच जाहीर केलेले नाही.

या यानाने जूनमध्ये एका रहस्यमय वस्तूला अवकाशात सोडले. त्यानंतर हे यान काही किलोमीटर दूर गेले आणि नंतर पुन्हा त्या वस्तूजवळ आले. या वस्तुचे काय काम आहे हे देखील अद्याप कळालेले नाही.

तज्ज्ञांच्या मते, हे यान शत्रूच्या वस्तूंचे निरीक्षण किंवा त्यांना नष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच, हे यान स्वतःच्या उपग्रहांना इंधन भरण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.जगातील अनेक देशांनी आपले स्वतःचे उपग्रह तयार केले आहेत. अशा वेळी, जर कोणत्याही देशाकडे असे यान असेल तर ते दुसऱ्या देशांच्या उपग्रहांना धोका निर्माण करू शकते.

अमेरिकेने २०१० मध्ये आपले एक्स-३७बी यान अवकाशात पाठवले होते. तर रशियानेही असेच काही उपग्रह पाठवले आहेत. मात्र, अमेरिका आणि रशियाने आपल्या यानांचे वापर केवळ तंत्रज्ञान चाचणीसाठी केला आहे असे म्हटले आहे.

चीनने या यानाबद्दल अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. हे यान उत्तर चीनमधील जियुक्वान येथून उड्डाण केले आणि देशाच्या जिनजियांग प्रदेशात असलेल्या एका हवाई दल क्षेत्रावर उतरले. हे हवाई दल क्षेत्र एकेकाळी अणु चाचण्यांसाठी वापरले जायचे आणि ते सध्याही लष्कराच्या कठोर नियंत्रणात आहे.

या यानाने २०२० मध्ये पहिले, २०२२ मध्ये दुसरे आणि २०२३ मध्ये तिसरे उड्डाण केली आहे. या यानाने किती काळ अवकाशात राहिले आहे याचाही नोंद घेतली जात आहे.

अमेरिकेचे अंतराळ कमांडर जनरल स्टीफन व्हिटिंग यांनी सांगितले की, चीनने अंतराळ क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, या यानाने काय सोडले आहे हे अद्याप त्यांना कळालेले नाही.

या यानाबद्दल अद्यापही अनेक प्रश्न आहेत. हे यान नेमके काय करते, त्याचा वापर काय आहे, हे अद्यापही कळालेले नाही. यामुळे जगभरातील देशांना चिंता वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT