Shipments of 10 crore mobiles done in last 6 months of 2020 Nagpur news
Shipments of 10 crore mobiles done in last 6 months of 2020 Nagpur news  
विज्ञान-तंत्र

कोरोनाकाळातही तब्बल इतक्या स्मार्टफोन्सची झाली भारतात शिपमेंट; पण कुठली कंपनी होती टॉपवर? वाचा सविस्तर  

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अन्न, पाणी आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांमध्ये आता मोबाईलचंही नाव सामील झालं आहे. एकवेळ माणूस पाण्याशिवाय आणि अन्नाशिवाय जगू शकेल मात्र मोबाईलशिवाय नाही अशी परिस्थिती आहे. त्यातच २०२०मध्ये कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक परिणाम झाला. त्यामुळे मोबाईलच्या मार्केटवरही काही प्रमाणात मंदी आली होती. मात्र २०२०च्या शेवटच्या सहा महिन्यांत हे चित्र पालटलं. गेल्या वर्षीच्या शेवटच्या ६ महिन्यांमध्ये भारतात तब्बल १० कोटी मोबाईल मागवण्यात आलेत अशी माहिती एका रिपोर्टमधून प्राप्त झाली आहे. मात्र यामागचं कारण काय? आणि कुठल्या कंपनीचे स्मार्टफोन्स सर्वात जास्त मागवण्यात आलेत याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

कोरोनामुळे गेलं संपूर्ण वर्ष संपूर्ण जगातील आर्थिक व्यवहार ठप्प होते. जीवनावश्यक वस्तू वगळल्यास चैनीच्या वस्तूंकडे लोकांनी पाठ फिरवली होती. म्हणूनच २०२०च्या पहिल्या सहा महिन्यांत भारतात स्मार्टफोन्सची शिपमेंट कमी प्रमाणात झाली. मात्र त्यानंतर आर्थिक व्यवहार हळूहळू पूर्ववत होऊ लागले. तसंच स्मार्टफोन्सची मागणीही वाढू लागली. त्यामुळे शेवटच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल १० कोटी स्मार्टफोसची शिपमेंट भारतात झाली. 

भारतात १० टक्के दरानं वाढू शकते स्मार्टफोन इंडस्ट्री 

यावर्षी भारतात स्मार्टफोन इंडस्ट्रीजमध्ये तब्बल १० टक्क्यांच्या दरानं वृद्धी होऊ शकते असा अंदाज सीएमआरकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसंच यावर्षी 5G स्मार्टफोनच्या विक्रीतही विलक्षण वाढ होणार आहे. यात शिपमेंटमध्ये १० पट वाढ होऊन ३ कोटींपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. ॲपल कंपनीनं भारतात आपली छाप कायम ठेवली आहे आणि पहिल्या १० स्मार्टफोन कंपन्यांमध्ये ॲपल सहाव्या क्रमांकावर आहे असंही सीएमआरनं सांगितलंय. 

सॅमसंग अग्रेसर 

गेल्या वर्षी भारतात शिपमेंट झालेल्या एकूण मोबाईल्सपैकी १९ टक्के स्मार्टफोन्स हे सॅमसंग कंपनीचे होते. मात्र २०२०मधील शेवटच्या ३ महिन्यांमध्ये शाओमी ही चिनी कंपनी २७ टक्के मार्केट शेअरसोबत पहिल्या नंबरवर होती असाही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. 

एकूणच काय तर कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीतही भारतात स्मार्टफोन्सची विक्री काही कमी झालेली दिसत नाही.  

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT