Aadhaar card misuse and digital fraud has defrauded a software engineer in Bengaluru of 12 crore rupees esakal
विज्ञान-तंत्र

Aadhar Card Scam : ..म्हणून म्हणतात आधार कार्ड जपा! एक छोटी चूक अन् IT इंजिनियरचं अकाउंट रिकामं, नेमकं प्रकरण वाचा

Aadhaar card misuse cyber fraud : बेंगळुरूतील एका सॉफ्टवेअर अभियंतेला आधार कार्ड फसवणूक आणि डिजिटल फसवणुकीतून १२ कोटींचा गंडा घालण्यात आला. फसवणूक करणाऱ्यांनी TRAI आणि मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बनावट ओळख दर्शवली.

Saisimran Ghashi

Cyber Fraud : डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची तब्बल १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशातील सायबर राजधानी समजल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

फसवणुकीचा बनाव

फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला TRAI (दूरसंचार नियामक प्राधिकरण) अधिकारी असल्याचे भासवत विजय कुमार या सॉफ्टवेअर अभियंत्याला कॉल केला. त्यांनी त्याला सांगितले की त्याच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असून मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात त्याच्या नावावर ६ कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणाची तक्रार दाखल झाली आहे. हा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असल्याचे भासवून विजय कुमारला भीती घातली.

व्हिडीओ कॉलचा वापर करून विश्वास संपादन

फसवणूक करणाऱ्यांनी पुढे व्हिडीओ कॉलवर स्वतःला मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवत त्याला अटक होण्याची भीती दाखवली. "तपासासाठी" म्हणून त्याच्याकडून त्याची वैयक्तिक माहिती व बँक खाते तपशील घेतले. या माहितीच्या आधारे, सायबर गुन्हेगारांनी त्याच्या खात्यातून एकूण ११.८३ कोटी रुपये विविध व्यवहारांच्या माध्यमातून लंपास केले.

विजय कुमारची तक्रार आणि पोलीस तपास

फसवणूक लक्षात येताच विजय कुमारने त्वरित तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सायबर फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण कसे करावे?

सायबर फसवणूक टाळण्यासाठी खालील बाबींची काळजी घ्या.

1. अशा कॉल्सला भीक घालू नका: कोणताही अनोळखी कॉल आला तर शांत राहा, कॉलकडे लक्ष द्या आणि संशयास्पद वाटल्यास कॉल लगेच बंद करा.

2. वैयक्तिक माहिती शेअर करू नका: आधार, बँक तपशील किंवा इतर वैयक्तिक माहिती देणे टाळा.

3. संशयास्पद कॉल्सची तक्रार करा: अशा कॉल्सची माहिती तातडीने 1930 क्रमांकावर किंवा संचार साथी पोर्टलवर नोंदवा.

फसवणुकीचे नवे प्रकार

सायबर गुन्हेगार सामाजिक अभियांत्रिकीचा (Social Engineering) वापर करून लोकांना भावनिकदृष्ट्या गळाला लावतात. ते स्वतःला सरकारी अधिकारी, पोलीस किंवा बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून भीती निर्माण करतात. त्यामुळे अशा प्रसंगी जागरूक राहा आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करा.

सरकारकडून सावधानतेचा इशारा

सरकारकडून अशा फसवणुकीबद्दल लोकांना सतर्क करण्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहेत. कोणत्याही संशयास्पद कॉलनंतर आता सावधानतेचा संदेश ऐकायला मिळतो. मात्र, यासाठी प्रत्येकाने स्वतः सतर्क राहणे ही काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळील सहर खड नदीवरील खचला

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT