mitron  
विज्ञान-तंत्र

मेड इन इंडिया शॉर्ट व्हिडिओ अॅप मिटरॉनने तीन नवीन सर्व्हिसेस केल्या सुरु, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या

सुस्मिता वडतिले

पुणे : मिटरॉन (Mitron) ने आपल्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त यूजर्ससाठी तीन विशेष सेवा सुरू केल्या आहेत. जे क्रिएटर्सना घरी बसून पैसे कमविण्यास देखील मदत करेल. या अॅपने गुगल प्ले स्टोअरवर 50 दशलक्ष डाऊनलोड मार्क ओलांडला आहे.

गेल्या वर्षी चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅप TikTok वर बंदी घातल्यानंतर मेड इन इंडिया अ‍ॅप 'Mitron' ने बाजारात प्रवेश केला. हे अॅप यूजर्समध्ये ही पसंत केले गेले आहे आणि गूगल प्ले स्टोअरवर तब्बल 50 दशलक्ष डाऊनलोड ओलांडल्याची वस्तुस्थितीवरून याची लोकप्रियताही लक्षात येते. मिटरॉन अॅपला बाजारात उतरल्यानंतर एक वर्ष झाले असून कंपनीने आपल्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त यूजर्ससाठी तीन विशेष सेवा सुरू केल्या आहेत. चला मेट्रोनच्या या तीन सर्व्हिसेसबद्दल डिटेलस जाणून घेऊया.

एक वर्षाच्या यशस्वी प्रवासानंतर मिटरॉनने आपल्या यूजर्सना Mitron Club, Mitron Academy आणि Mitron On-Demand सारख्या सेवा सादर केल्या आहेत. जे यूजर्सना विशेष अनुभव देण्याबरोबरच क्रिएट्समध्ये उत्साह वाढवेल. मिटरॉन टीव्हीच्या मिटरॉन क्लबबद्दल बोलताना हे शॉर्ट फॉरमॅट व्हिडिओ अ‍ॅप देखील प्रदान करते जे व्यवसायांच्या मोनोटाइजेशन मदत करते. याव्यतिरिक्त, क्लबमार्फत अॅप क्रिएटर्सना यूजर्ससाठी मनोरंजक कंटेंट तयार करण्याची एक अनोखी संधी प्रदान करते. तसेच, क्लब सदस्य त्यांच्या आवडत्या क्रिएटरशी थेट कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांना इच्छित कंटेंट पाहू शकतात. अशा प्रकारे, हे प्लेटफॉर्म क्रिएटर्सना कंटेंट तयार करुन आणि मोठ्या प्रेक्षकांना गुंतवून त्यांची प्रतिभा दर्शविण्याची संधी प्रदान करते.

Mitron Academyच्या माध्यमातून क्रिएटर्सना शैक्षणिक व्हिडिओ शेयर करण्याची संधी मिळते, ज्यामुळे प्लॅटफॉर्मद्वारे शिकण्याची संधी मिळते. म्हणजेच, Mitron Academy सर्व्हिसद्वारे आपल्याला मनोरंजन तसेच अभ्यासाशी संबंधित बर्‍याच माहिती मिळतील. याशिवाय कंपनीने मायट्रॉन ऑन-डिमांड ही तिसरी सेवाही सुरू केली आहे. ज्यामध्ये यूजर ज्योतिष, गाणे डेडिकेशन, टिप्स आणि हॅक्स, बर्थडे विशेष इत्यादी ऑन-डिमांड कंटेंटसाठी विनंती करु शकतात.

कंपनीचे म्हणणे आहे की मिटरॉन टीव्हीने त्याचे तंत्रज्ञान देखील आधुनिकीकरण केले आहे आणि हे प्लॅटफॉर्म आपल्या यूजर्ससाठी आणि क्रिएटर्स अनुकूल इंटरफेस प्रदान करते. अ‍ॅपद्वारे बर्‍याच तांत्रिक पुढाकार घेण्यात आल्या आहे. ज्यामुळे युजर इंटरफेस सुधारण्यास मदत होईल. यात रेकमंडेशन इंजिन आणि एडीटर टूल समाविष्ट आहेत. एडिटर टूलच्या मदतीने क्रिएटरना त्यांची कंटेंट एडिट करण्यासाठी अन्य व्हिडिओ एडीटर अ‍ॅप्सवर लॉग-इन करणे आवश्यक नाही. त्याच वेळी, रेकमंडेशन इंजन वैशिष्ट्याद्वारेक्रिएटरस व्हिडिओवर अधिक व्यूज मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Junnar Migratory Bird : युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्डची जुन्नर तालुक्यात प्रथमच नोंद; जैवविविधतेसाठी ऐतिहासिक क्षण!

SCROLL FOR NEXT