Shubhanshu Shukla Video International Space Station Gaganyan Mission esakal
विज्ञान-तंत्र

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्ला तुस्सी ग्रेट हो! Ax-4 मिशनचा भारताच्या ‘गगनयान’साठी फायदा, पाहा व्हिडिओतून काय म्हणाले अंतराळवीर..

Shubhanshu Shukla Video International Space Station Gaganyan Mission : ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात ऐतिहासिक झेप घेतली असून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. ही मोहीम भारताच्या ‘गगनयान’ यशासाठी महत्त्वाची पायरी ठरत आहे.

Saisimran Ghashi

Shubhanshu Shukla Space Video : भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक सुवर्णक्षण लिहिला गेला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) यशस्वीपणे प्रवेश करून भारतासाठी एक नवा इतिहास घडवला आहे. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक उड्डाणानंतर तब्बल ४० वर्षांनी भारताचा एक नागरिक पुन्हा अंतराळात झेपावला आहे

शुक्ला हे केवळ अंतराळात गेलेले दुसरे भारतीय ठरले, तर ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. हे मिशन भारतीय अवकाश मोहिमांसाठी एक मैलाचा दगड ठरले असून,भारताच्या भविष्यातील ‘गगनयान’ मोहिमेसाठी अत्यंत महत्वाची तयारी आहे.

या ऐतिहासिक टप्प्याची शक्यताच भारत सरकार, इस्रो, अमेरिकेची अंतराळ संस्था NASA आणि खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिओम स्पेस यांच्या संयुक्त सहकार्यामुळे साकार झाली. स्पेसएक्सच्या रॉकेटमधून उड्डाण करताना शुक्ला यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने एक संपूर्ण नव्या युगाची झेप घेतली गेली.

भारताने ‘गगनयान’ मोहिमेद्वारे स्वदेशी मानवयुक्त अंतराळ मोहिमांची उभारणी सुरू केली आहे. इस्रो सध्या आपल्या शक्तिशाली LVM3 रॉकेटमध्ये मानवसुरक्षिततेसाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करत आहे. हे पुढे ‘भारतीय अंतरिक्ष स्थानक’ म्हणजेच Bharatiya Antariksh Station (BAS) ची उभारणी करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असेल.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकारी वैमानिकांनी रशियामध्ये ‘गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर’ येथे अत्याधुनिक प्रशिक्षण घेतले. यात शून्य गुरुत्वाकर्षणातील कामगिरी, जिवंत राहण्याचे तंत्र, आणि अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतील मानसिक शारीरिक तयारी यांचा समावेश होता. यानंतर शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन नायर यांनी NASA च्या ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये स्पेसएक्स ड्रॅगन यान आणि ISS वरील उपकरणांची सविस्तर ओळख करून घेतली.

तरुण पिढीसाठी प्रेरणादायी

राकेश शर्मा यांचे "सारे जहाँ से अच्छा" हे शब्द आजही भारतीयांच्या मनात घर करून आहेत. आता ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे अंतराळातले यश नव्या पिढीसाठी नवीन स्वप्नांची दारे उघडणारे ठरेल. त्यांचे हे धाडसी पाऊल इस्रोच्या आगामी गगनयान मोहिमेला दिशा देईल आणि भारताच्या अंतराळ स्वप्नांना नवे बळ देईल.

आज भारत केवळ प्रेक्षक नाही, तर आंतरराष्ट्रीय अंतराळ युतीचा एक सक्रिय आणि विश्वासार्ह भागीदार झाला आहे. आणि या पुढे भारत केवळ पृथ्वीच्या कक्षेपुरता मर्यादित न राहता अंतराळाच्या असीम आकाशात स्वतःचं स्थान निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT