PM Modi at Smart India Hackathon eSakal
विज्ञान-तंत्र

PM Modi : 'वेगाने प्रगती करतंय 'एआय', नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज'; Smart India Hackathon मध्ये पंतप्रधानांचं वक्तव्य

PM Modi on AI : टेक्नॉलॉजी हा जीवनाचा अभूतपूर्व भाग झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आयात न करणे, किंवा त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहणे हे भारताचं लक्ष्य असायला हवं.

Sudesh

Smart India Hackathon 2023 : मंगळवारी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचा अंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी 'एआय' म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबाबत चर्चा केली. एआय हे वेगाने प्रगती करत असून, नागरिकांनी नवीन टेक्नॉलॉजीबाबत सतर्क रहायला हवं असं ते म्हणाले.

आत्मनिर्भर होण्याचं लक्ष्य

पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले, की भारताकडे जगातील सर्वात मोठं प्रतिभेचं भांडार आहे. जगाचा भारतावर विश्वास आहे. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि व्यापक उपाय देऊ शकतो. टेक्नॉलॉजी हा जीवनाचा अभूतपूर्व भाग झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आयात न करणे, किंवा त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहणे हे भारताचं लक्ष्य असायला हवं.

डीपफेक

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे वेगाने बदलतंय. एका समस्येवर उपाय शोधला तर लोक दुसरी समस्या उभारू शकतात. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाबाबत आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. जर नियमांचे पालन करुन टेक्नॉलॉजी वापरली तर त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. मात्र जर चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला तर कित्येक समस्या निर्माण होऊ शकतात.

डीपफेक व्हिडिओ हे अगदी खरे वाटतात, त्यामुळे कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. यासाठी भारत एक वैश्विक आराखडा तयार करत आहे; असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

स्टडी इन इंडिया

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचा अंतिम राउंड अहमदाबादमध्ये पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधानांनी यावेळी भारतीय रेल्वेबाबत देखील चर्चा केली. "भारतीय रेल्वे आता कात टाकत आहे. केंद्र सरकार यावर हजारो रुपये खर्च करत आहे. आमचा फोकस लॉजिस्टिक्सवर आहे. तुमच्या टीममध्ये बांगलादेशमधील विद्यार्थ्यांना पाहून मला आनंद झाला. उच्चशिक्षणासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 'स्टडी इन इंडिया' अभियान सुरू केलं आहे." असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT