Smartphone Charge With Urine  Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Charge With Urine : आला नवा रँचो, मुत्रविसर्जनातून करणार मोबाईल चार्ज

सकाळ डिजिटल टीम

Smartphone Charge With Urine : थ्री इडिएट्समधील रँचो सर्वाना आठवत असेल. पिक्चरमधील रँचोच्या करामती आणि त्याचे बुद्धीकौशल्या पाहून सगळ्यांना आवाक व्हायला होतं.

असे अनेक रँचो आपल्या अवती भवती फिरत असतात. त्यात आपल्या प्रत्येकाकडे आज स्मार्टफोन आहे. मोबाईलच्या वापराप्रमाणे त्याची बॅटरी संपत असते. अतिरिक्त वापर असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्यासोबत नेहमी चार्जर घेऊन फिरावे लागते.

यासाठी अनेकजण पॉवर बँक किंवा चार्जर घेऊन फिरताना बघितले असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, शरीरातून बाहेर पडणाऱ्या लघवीतूनही आता मोबाईल चार्च करणं शक्य होणार आहे.

विश्वास बसत नाहीये नाही ना? पण सध्या विज्ञान आणि तंत्रत्रान इतकं पुढे गेले आहे की, आता शरीरातून बाहेर पडणाऱ्या लघवीतून वीज निर्मिती केली जात आहे. या उर्जेतून तयार होणाऱ्या विजेपासून आता मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करणे शक्य होणार आहे.

लघवीचे वीजेमध्ये रूपांतर

शरीरातून बाहेर पडणाऱ्या लघवीचे विजेत रुपांतर करण्यावर सध्या ब्रिटनमध्ये बरेच काम सुरू आहे. वैज्ञानिकांना यामध्ये मोठ्या प्रमाणात यशदेखील मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.

लघवीपासून वीज निर्मितीत यश आल्यास भविष्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असेल कारण, मानवी मूत्र हा एक अक्षय स्त्रोत आहे.

लघवीपासून तयार होणाऱ्या वीजेपासून मोबाईल होणार चार्ज?

प्रकाशित वृत्तांनुसार, वैज्ञानिकांनी आतापर्यंत लघवीच्या माध्यमातून एका छोटा मोबाईल चार्ज होईल इतक्या विजेची निर्मिती केली आहे. 'मायक्रोबियल फ्युएल सेल'चा वापर अशाप्रकारे वीज निर्मितीसाठी केला जात आहे. जे एक ऊर्जा परिवर्तक आहे.

वीज निर्मितीसाठी लघवीत काही विषाणूदेखील मिसळले जात असून, ब्रिस्टल रोबोटिक्स प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनीही मूत्रापासून बनवलेली वीज मोफत मिळणार असल्याचे सांगितले आहे.

हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास बाथरूममध्येही याचा वापर करता येईल. हे शॉवर, लाइटिंग, रेझर आणि स्मार्टहोम चार्ज करण्यासाठी सहज पुरेशी वीज निर्माण करेल असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT