Smartphone Tips Esakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Tips : वारंवार फोन होतोय ओव्हरहीट? या टिप्स वापरून लगेच करा कूल

अती गरम झालेला फोन खराब होण्याचा किंवा अगदी ब्लास्ट होण्याचा धोका असतो.

Sudesh

उन्हाळ्यामध्ये आपला फोन वारंवार ओव्हरहीट होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अगदी नॉर्मल यूज असला, तरीही फोन भरपूर गरम होत असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. अती गरम झालेला फोन खराब होण्याचा किंवा अगदी ब्लास्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे तातडीने असा फोन थंड करणं गरजेचं असतं.

उन्हाळ्यात आपला गरम झालेला फोन लवकरात लवकर कसा थंड करता येईल, याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचं आयुष्य वाढवू शकाल.

उन्हापासून ठेवा दूर

स्मार्टफोन गरम होण्याची कित्येक कारणं असू शकतात. उन्हाळ्यामध्ये थेट पडणारा सूर्यप्रकाश हेदेखील याचं मुख्य कारण असू शकतं. त्यामुळे शक्यतो आपला स्मार्टफोन थेट सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा.

चार्जिंग

तुमचा फोन जर चार्जिंगला लावलेला असताना गरम झाला असेल, तर त्वरीत स्विच बंद करून, तो चार्जिंगवरून काढा. असं वारंवार होत असेल, तर दुकानात जाऊन मोबाईलची बॅटरी तपासून घ्या.

फोनचं कव्हर

तुमच्या फोनचं कव्हर देखील त्याला ओव्हरहीट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. कव्हर घातल्यामुळे एअरफ्लो आणि टेम्परेचर कंट्रोल अशा गोष्टी नीट काम करू शकत नाहीत. त्यामुळे शक्यतो कव्हर वापरू नका, किंवा फोन ओव्हरहीट झाल्यास कव्हर काढून ठेवा.

अ‍ॅप्स करा बंद

फोनमध्ये एकाहून अधिक अ‍ॅप्स सुरू असतील, आणि प्रोसेसर क्षमतेपेक्षा जास्त काम करत असेल तर अशा वेळी फोन ओव्हरहीट होऊ शकतो. त्यामुळे सुरू असलेले सर्व अ‍ॅप्स बंद करणे हा देखील फोन लवकर थंड करण्याचा एक मार्ग आहे.

फोन करा ऑफ

स्मार्टफोन स्विच ऑफ केल्यामुळे तो वेगाने थंड होऊ शकतो. फोनमधील सर्वच प्रक्रिया बंद झाल्यामुळे तो लवकर कूल-डाऊन होतो. याव्यतिरिक्त, गरम झालेला फोन फॅनजवळ ठेवल्याने, किंवा एसी रूममध्ये नेल्याने देखील तो लवकर थंड होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT