आपला फोन 'फ्लाइट मोड'वर न ठेवता तुम्ही या कॉल्सपासून कशी सुटका करू शकता, ते पाहूयात.
प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन (Smartphone) आहेच. काम करताना, कुटुंबासमवेत बसून किंवा टीव्ही (TV)पाहताना प्रत्येक वेळी आपण मोबाईल (Mobile) आपल्या जवळ ठेवतो. स्मार्टफोन यूजर असल्याने तुम्हाला हे माहीत असेलच की, जवळजवळ दररोज बँका, टेलिकॉम कंपन्या इ.चे फोन कॉल्स येत असतात, जे तुम्हाला त्रास देतात. आपला फोन 'फ्लाइट मोड'वर न ठेवता तुम्ही या कॉल्सपासून कशी सुटका करू शकता, ते पाहूयात.
हे कॉल्स त्रास देतात
स्पॅम कॉल्स बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, मात्र या प्रयत्नांनंतरही ग्राहकांना अनेक स्पॅम कॉल्स येतच असतात. स्पॅम कॉल व्यतिरिक्त, कधीकधी आपण नॉर्मल कॉल घेणे टाळतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही पर्यायांविषयी सांगणार आहोत जे तुम्ही या कॉल्समधून सहज टाळू शकता.
तुमच्या स्मार्टफोनच्या कॉल सेटिंगमध्ये तुम्हाला या समस्येवर उपाय सापडेल. पहिला सेटिंग्जवर जा, त्यानंतर 'कॉल फॉरवर्डिंग' या पर्यायावर क्लिक करा. येथे 'ऑलवेज फॉरवर्ड', 'फॉरवर्ड वेन बिजी' आणि 'फॉरवर्ड वेन उननसार्ड' असे तीन पर्याय दिसतील.
यातून 'ऑलवेज फॉरवर्ड'चा पर्याय निवडा. त्यानंतर एकतर बंद असलेला नंबर किंवा न वापरणारा नंबर टाका आणि त्यानंतर 'इनेबल' बटणावर क्लिक करा. यामुळे आपल्या नंबरवर येणारे सर्व कॉल बंद होतील आणि आपल्याला फ्लाइट मोड देखील वापरावा लागणार नाही.
कॉल फॉरवर्डिंग आणि फ्लाइट मोडशिवाय तुम्हाला वापरता येईल असा पर्यायही तुमच्याकडे आहे आणि तो पर्याय म्हणजे 'कॉल बारिंग'. तुमच्या स्मार्टफोनच्या कॉल सेटिंगमध्ये जाऊन हा पर्याय निवडा. येथे 'ऑल इनकमिंग कॉल्स'चा पर्याय निवडा आणि त्यानंतर 'कॉल बारिंग'चा पासवर्ड टाका. हा पासवर्ड साधारणपणे 0000 किंवा 1234 असा असतो. आता 'टर्न ऑन' या पर्यायावर टॅप करा आणि तुमचं काम पूर्ण होईल.
या सोप्या ट्रिक्समुळे तुम्ही सर्व प्रकारच्या फोन कॉल्सपासून लांब राहू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.