Social media ban in Kashmir: 16-year-old develops 'KashBook' 
विज्ञान-तंत्र

काश्‍मीरमधील तरुणाने बनवले फेसबुकप्रमाणे 'काशबुक'

वृत्तसंस्था

अनंतनाग (जम्मू-काश्‍मीर) : काश्‍मीरमधील अस्थिर परिस्थिती तेथे वेळोवेळी फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्‌विटरसारख्या सोशल मिडिया माध्यमांवर बंदी आणली जाते. मात्र, यावर मात करण्याचा प्रयत्न एका काश्‍मीरमधील सोळा वर्षाच्या तरुणाने केला असून काश्‍मीरमधील युवकांना एकत्र आणण्यासाठी त्याने Kashbook तयार केले आहे.

दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या काश्‍मीरमधील सोळा वर्षाच्या झेयन शफीक नावाच्या तरुणाने ही साईट तयार केली आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्याकडून प्रेरणा घेत ही साईट तयार झेयनने ही साईट तयार केली आहे. Kashbook.com ही फेसबुकसदृश सोशल साईट असून ही साईट म्हणजे 'काश्‍मीरचे स्वत:चे सोशल नेटवर्क' असल्याचा दावा करण्यात येत आहे. झेयनने त्याचा 19 वर्षांचा मित्र उझैर जानसोबत 2013 पासून या साईटवर काम करण्यास सुरुवात केली होती. अलिकडच्या काळात जम्मू-काश्‍मीरमधील सोशल मिडियावर वेळोवेळी बंदी घालण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर झेयनने काही महिन्यांपूर्वीच ही साईट पुन्हा नव्याने सुरू केली आहे. अल्पावधीतच हजारो युजर्स या साईटकडे आकर्षित होत असल्याचे वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात सहा संचालकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT