Pocket AC Reon Pocket 2  google
विज्ञान-तंत्र

कुठेही सोबत घेऊन फिरता येईल असा छोटा AC कुठे मिळतो माहितीये का ?

या एसीचे Reon Pocket AC हे मॉडेल पूर्वीपासूनच बाजारात उपलब्ध आहे. नवे मॉडेल आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक कूलिंग देते.

नमिता धुरी

मुंबई : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने घरात पंखा, कूलर, एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. यासाठी बाजारात बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. सोनीने बाजारात Pocket AC Reon Pocket 2 लॉन्च केला आहे. हा एसी छान कूलिंग देतो. तसेच हा एसी एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे सोबत ठेवता येतो. त्यामुळे कुठेही गेल्यावर कुलिंग मिळते.

या एसीचे Reon Pocket AC हे मॉडेल पूर्वीपासूनच बाजारात उपलब्ध आहे. नवे मॉडेल आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक कूलिंग देते. डिझाइन मात्र पूर्वीप्रमाणेच आहे. Sony Reon Pocket 2 AC चे वैशिष्ट्य असे आहे की, तुम्ही याचा वापर एखाद्या वॉर्मरसारखाही करू शकता.

कंपनीच्या दाव्याप्रमाणे हा एसी स्मार्टफोनद्वारे चालवता येतो. तसेत कपड्यांमध्येही बसवता येतो. हा एसी शरीराच्या त्वचेला स्पर्श करून गरम किंवा थंड करतो. कंपनीचे म्हणणे आहे की खासकरून व्यायाम करताना वापरण्यासाठी हा एसी बनवण्यात आला आहे. हा स्वेटप्रूफ आणि ड्रिपप्रूफसुद्धा आहे.

या एसीची किंमत १० हजार ५०० रुपये आहे. सध्या हा नवीन एसी जपानच्या बाजारात उपलब्ध आहे. तो भारतात कधी आणला जाईल याबद्दल काहीही माहिती कंपनीने दिलेली नाही. पण उन्हाळा सुरू असल्याने लवकरच तो भारतात आणला जाईल असे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

संजय लीला भन्साळींसोबत रिलेशनशिप तरीही अविवाहित आहेत गीता कपूर; का नाही केलं लग्न? सांगितलं खरं कारण

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

SCROLL FOR NEXT