south koreas dnauri captures lander vikram on the moons shiva shakti point chandrayaan 3 sakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 : कोरियाच्या ‘धानुरी’ने टिपले विक्रम लँडरचे छायाचित्र

चांद्रयान-३’ चंद्रावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे २७ ऑगस्टला त्या जागेचे छायाचित्र ‘धानुरी’ने सुमारे १०० किलोमीटर अंतरावरून काढले होते.

सकाळ वृत्तसेवा

सोल : भारताच्या ‘चांद्रयान-३’चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी उतरले, त्याचे छायाचित्र चंद्राभोवती फिरणाऱ्या दक्षिण कोरियाच्या धानुरी या ऑर्बिटरने काढले आहे. येथील विज्ञान मंत्रालयाने हे छायाचित्र प्रसिद्ध केले.

‘चांद्रयान-३’ चंद्रावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे २७ ऑगस्टला त्या जागेचे छायाचित्र ‘धानुरी’ने सुमारे १०० किलोमीटर अंतरावरून काढले होते. चंद्रावर उतरण्यायोग्य संभाव्य जागांची छायाचित्रे काढणे हे ‘धानुरी’चे प्राथमिक उद्दिष्ट आहे. धानुरी ऑर्बिटरने काढलेली आणखी काही छायाचित्रे डिसेंबर महिन्यात प्रसारित करण्याचा विचार असल्याचे विज्ञान आणि ‘आयसीटी’ मंत्रालय (एमएसआयटी) आणि कोरिया अवकाश संशोधन संस्थेने (कारी) सांगितले.

भविष्यात चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा व चंद्रावरील पाच विविध घटकांचे नकाशे व अन्य गोष्टींच्या छायाचित्रांचा समावेश आहे. धानुरी ऑर्बिटर डिसेंबर २०२४ पर्यंत कार्यरत राहणार आहे.

‘जाक्सा’चे अंतराळयान कार्यरत

जपानच्या अवकाश संशोधन संस्थेने (जाक्सा) सोडलेले ‘एक्स-रे इमॅजिंग अँड स्पेक्ट्रेस्कोपी मिशन’ (एक्सआरआयएसएम) हे यान कार्यरत झाले असून त्याचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षेशी संपर्क स्थापन झाला आहे. योग्य उंचीवर ते स्थापन झाल्याने मोहिमेचा कठीण कालावधी पार पडला, असे ‘जाक्सा’ने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली चुकीची, शरद पवार यांचे मत; सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

Jayakwadi Dam: जायकवाडीतून क्षमतेच्या दीडपट अधिक विसर्ग; इतिहासात पहिल्यांदाच सोडले तब्बल १४४ टीएमसी पाणी

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Drowning Death: 'मुलाला वाचविताना वडिलांचा बुडून मृत्यू'; नागझरी नदीतील दुर्घटना; मुलगा गंभीर, नेमकं काय घडलं..

Irani Cup 2025: विदर्भ तिसऱ्यांदा इराणी करंडक विजेता; शेष भारत संघाला ९३ धावांनी नमवले, धुलची एकाकी झुंज, अथर्व सामनावीर

SCROLL FOR NEXT