Space Station  esakal
विज्ञान-तंत्र

Space Station : आज आकाशात दिसणार स्पेस स्टेशन, ही संंधी अजिबात चुकवू नका; जाणून घ्या वेळ

सकाळ डिजिटल टीम

Space Station : स्पेस स्टेशन म्हणजेच अवकाशात अंतराळवीरांना प्रयोग करण्याची तसेच त्यांची राहण्याची जागा. यात अंतराळवीर विविध प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला अवकाश स्थानक म्हणजे स्पेस स्टेशन विषयी अप्रुप असत, यासह ते कस दिसत असेल याविषयी मनात कुतूहल असत. यासाठी आपण इंटरनेटवर त्याचे फोटो व्हिडीओ बघत असतो.

आजचा दिवस आहे खास

आजचा दिवस काही खास आहे. आज आपणा सर्व पृथ्वीवासियांना अंतराळातील हे स्पेस स्टेशन आपल्या घराच्या गच्चीवरुन पाहता येणार आहे. हो हे खरयं. आज स्पेस स्टेशन सर्वांना पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे. नेमकं कधी दिसेल आणि कुठे दिसेल हे स्पेस स्टेशन ते आपण जाणून घेऊया.

स्पेस स्टेशन बघण्याची ही सुवर्ण संधी

खगोल अभ्यासक अमोघ जोशी सांगतात, आज आकाशात सायंकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी याची सुरुवात दक्षिण-पश्चिम दिशेच्या मधून होईल आणि स्पेस स्टेशन पूर्व- उत्तर दिशेकडे जाईल. 6 वाजून 33 मिनिटांपर्यंत ते आपल्याला दिसत राहील.

आकाशात स्पेस स्टेशन जवळ जवळ 5 मिनिट 30 सेकंद आपल्याला दिसेल. त्यामुळे सर्वांनी स्पेस स्टेशन बघण्याची ही सुवर्ण संधी अजिबात चुकवू नये असे अमोघ जोशी 'सकाळ'शी बोलताना म्हणाले.

कोणत्या शहरांत दिसेल स्पेस स्टेशन...?

अवकाश स्थानक म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे पृथ्वी भोवती 400 कि. मी. उंचीवरून ताशी 27 हजार 580 किमी इतक्या प्रचंड वेगाने फिरते आहे ते आज जगभरात बघता येणार आहे.

केवळ प्रत्येक शहरानुसार त्याचा ठळकपणा (Brightness) थोडा कमी - जास्त असेल इतकच. पण सर्वांना आणि सर्वत्र स्पष्टपणे हे स्पेस स्टेशन दिसेल हे नक्की. कुठे ढगाळ वातावरण असल्यास थोडा अडथळा येऊ शकतो असेही अमोघ जोशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT