Psyche Mission eSakal
विज्ञान-तंत्र

Psyche Mission : स्पेस एक्सच्या रॉकेटसह नासाचं यान लाँच, अंतराळातील 'सोन्याच्या' लघुग्रहाचा करणार अभ्यास; पाहा व्हिडिओ

Space X Nasa : यासाठी स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन हेव्ही रॉकेटचा वापर करण्यात आला.

Sudesh

नासाचं Psyche यान अंतराळात लाँच झालं आहे. भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी (13 ऑक्टोबर) सायंकाळी या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. यासाठी स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन हेव्ही रॉकेटचा वापर करण्यात आला. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरील 39A या लाँचपॅडवरुन हे प्रक्षेपण करण्यात आलं.

मंगळ आणि बुध ग्रहाच्या मध्ये असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्ट्यामध्ये हे यान जाईल. यामध्ये असणाऱ्या 16 Psyche या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. या लघुग्रहावर कित्येक किंमती धातू आणि खनिजं उपलब्ध आहेत. त्यामुळे याला 'सोन्याचा लघुग्रह' देखील म्हटलं जातं.

ही मोहीम यापूर्वीच लाँच करण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव ती पुढे ढकलून 12 ऑक्टोबरला नियोजित करण्यात आली. हवामान खराब असल्यामुळे पुन्हा हे प्रक्षेपण 13 ऑक्टोबरला शिफ्ट केलं गेलं. शुक्रवारी सायंकाळी 7:49 वाजता या यानाचं प्रक्षेपण पार पडलं. यानंतर तासाभरात हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं.

सोलार पॉवरवर चालणारं हे स्पेसक्राफ्ट सहा वर्षांमध्ये याठिकाणी पोहोचणार आहे. यानंतर हे स्पेसक्राफ्ट लघुग्रहाच्या भोवती फिरून त्याचा अभ्यास करेल. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये काय आहे, याचा अंदाज लावण्यासाठी या लघुग्रहाची मदत होऊ शकते असा अंदाज देखील शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या यानाच्या ऑर्बिटरमध्ये असणारे गामा-रे आणि न्यूट्रॉन स्पेक्ट्रोमीटर यांचा वापर लघुग्रहाच्या अभ्यासासाठी होणार आहे.

इटालियन खगोलशास्त्रज्ञ अ‍ॅनीबेल डी. गॅस्पारिस यांनी या लघुग्रहाचा शोध लावला होता. पृथ्वीवरील ऑप्टिकल टेलिस्कोप आणि शक्तिशाली रडारने केलेल्या निरीक्षणानुसार, या लघुग्रहावर कित्येक किंमती धातू आणि खनिजं उपलब्ध आहेत. यांची किंमत अब्जावधी डॉलर्स असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT