Split Ac Vs Window AC esakal
विज्ञान-तंत्र

Split Ac की Window AC? जाणून घ्या उन्हाळ्यात कुठला AC करेल तुमची खोली थंड

विंडो आणि स्प्लिट एसी मधील फरक माहित असणे आवश्यक आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Split Ac Vs Window AC: उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे एसी विक्रीलाही पुन्हा एकदा वेग येणार आहे. आज आम्ही तुम्हाला दोन एसी बद्दल सांगणार आहोत. यामध्ये स्प्लिट एसी आणि विंडो एसीच्या नावांचा समावेश आहे. तुम्हीही या उन्हाळ्यात एसी लावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती घ्यायला हवी. विशेषत: विंडो आणि स्प्लिट एसी मधील फरक माहित असणे आवश्यक आहे.

काही दिवसांत उन्हाने उकाळा वाढला ही अनेकांना एसीची गरज भासते. यंदा उन्हाळ्यात तुम्ही नवा एसी घेण्याचा विचार करत असेल तर कोणता एसी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल, कुठल्या एसीचा कूलींग पावर बेस्ट आहे ते जाणून घेऊया.जेणेकरून नवा एसी घेताना तुम्हाला कंफ्युजन राहाणार नाही.

Split Ac की Window AC?

ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे अशा ठिकाणी विंडो एसी बसवला जातो. ते बसवण्यासाठी तुमच्या घराच्या खिडकीवर जागा असावी कारण ती फक्त खिडकीवरच बसते. पण जर तुमचे घर पूर्ण पॅक असेल तर हा एसी तुमच्यासाठी नसेल. कूलींगच्या बाबतीत विंडो एसी देखील खूप चांगले आहे. त्याचा हवेचा प्रवाहही जास्त असतो. तसेच, त्याची किंमत देखील खूप कमी आहे. (Technology)

Split Ac-

स्प्लिट एसी मध्ये, इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही युनिट वेगळे आहेत. पण स्प्लिट एसीची खासियत म्हणजे तो कुठेही सहज बसवता येतो. कारण तुम्ही टेरेसवर आऊटडोअर इन्स्टॉल करू शकता आणि खोलीत कुठेही इनडोअर इन्स्टॉल करू शकता. हेच कारण आहे की भारतात सर्वाधिक विक्री फक्त स्प्लिट एसीची आहे. मात्र या एसीची किंमत देखील थोडी जास्त आहे. तसेच त्याची फिटींग देखील सोपी नाही. पण तुम्हाला कूलिंगची कोणतीही तक्रार असणार नाही. (Summer)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT