Sriram Krishnan AI Policy Advicer : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक श्रीराम कृष्णन यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (AI) वरिष्ठ सल्लागार म्हणून निवड केली आहे. श्रीराम कृष्णन हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती असून त्यांनी मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, याहू!, फेसबुक आणि स्नॅप यांसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे.
श्रीराम कृष्णन आता व्हाईट हाऊसचे AI आणि क्रिप्टो झार डेव्हिड सॅक्स यांच्यासोबत काम करणार आहेत. ट्रम्प प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करणे आणि समन्वय साधणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल. "श्रीराम कृष्णन अमेरिकेचे AI मधील नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी काम करतील आणि विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार परिषदेबरोबर समन्वय साधून सरकारच्या AI धोरणावर लक्ष केंद्रित करतील," असे ट्रम्प यांनी Truth Social वर सांगितले.
चेन्नईमध्ये जन्मलेले आणि भारतात पदवी पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेले श्रीराम कृष्णन केवळ तंत्रज्ञान तज्ज्ञच नाहीत, तर ते व्हेंचर कॅपिटॅलिस्ट, लेखक, आणि प्रसिद्ध पॉडकास्टर देखील आहेत. त्यांनी पत्नी आरती रामामूर्ती यांच्यासोबत "The Aarthi and Sriram Show" पॉडकास्टची सह-स्थापना केली, ज्याला स्टार्टअप समुदायात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
2022 मध्ये ट्विटरच्या पुनर्बांधणीसाठी श्रीराम कृष्णन यांनी एलन मस्कसोबत काम केले होते. त्यावेळी त्यांना ट्विटरचे CEO होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच, माजी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि एलन मस्क यांना एकत्र आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
श्रीराम कृष्णन यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, "मला देशाची सेवा करण्याचा सन्मान मिळाल्याचा अभिमान आहे. अमेरिकेचे AI क्षेत्रातील नेतृत्व कायम ठेवण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन."
SRM Institute of Science and Technology (SRMIST) कत्तांकुलथुर येथे शिक्षण घेण्यापासून ते थेट व्हाइट हाऊसमध्ये श्रीराम कृष्णन यांची सीनियर पॉलिसी अॅडवायझर म्हणून नियुक्ती हे मोठे यश मानले जात आहे. हे यश SRMIST च्या शिक्षणाच्या गुणवत्ता आणि शिस्तीचे प्रतीक आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे कॉलेजच्या पायाभूत सुविधांची आणि शिक्षण प्रणालीचे पुन्हा महत्त्व एकदा सिद्ध झाले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची संधी दिली मिळते.
तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढती कामगिरी ही भारतासाठी गौरवाची बाब ठरत आहे. श्रीराम कृष्णन यांची ही निवड AI क्षेत्रातील जागतिक नेतृत्वासाठी अमेरिकेच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.