Only 27 Days of Fuel Left for Stranded Astronauts esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams Trapped: सुनीता विल्यम्स धोक्यात! फक्त एवढ्या दिवसांचं इंधन शिल्लक, NASAचं टेन्शन वाढलं

Starliner Fuel Problem: नासाच्या अंतराळ मोहिमेदरम्यान भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्याची चर्चा मोठ्या स्तरावर सुरू आहे.

Saisimran Ghashi

NASA : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या (NASA) अंतराळ मोहिमेदरम्यान भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्याची चर्चा मोठ्या स्तरावर सुरू आहे. त्यांच्यासोबत अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोरही आहेत. दोघेही ५ जूनला स्टारलाइनर अंतराळयानाद्वारे अंतराळात गेले होते. तेव्हा त्यांची १३ जून रोजी पृथ्वीवर परत येण्याची योजना होती. मात्र, अंतराळयानात झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे परतीच्या प्रवासात विलंब होत आहे.

नेमक काय झालं?

स्टारलाइनर अंतराळयानात हेलियम गॅसची गळती झाली आहे. याच गळतीमुळे त्यांची परती रखडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, NASA आणि बोइंग यांना या गळतीची माहिती मोहिम सुरू होण्याआधीच होती. तरीही त्यांनी या गळतीकडे दुर्लक्ष केलं आणि ते तेथे छोटासा धोका मानून मोहिम सुरू केली. आता मात्र याच गळतीमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकले आहेत. या गळतीमुळेच यापूर्वीही ही मोहिम 7 मे रोजी प्रक्षेपित होणार होती, ती स्थगित करण्यात आली होती.

इंधनाची चिंता

हेलियम गळतीमुळे चार वेळा थ्रस्टरही निकामी झाल्याची माहिती आहे. आता या अंतराळयानाकडे फक्त २७ दिवसांचेच इंधन शिल्लक आहे. बोइंगच्या स्टारलाइनर कार्यक्रमाचे व्यवस्थापक मार्क नॅपी यांनी या हेलियम प्रणालीची कार्यक्षमता अपेक्षेप्रमाणे नसल्याचे सांगितले आहे. दोन्ही अंतराळवीरांची सुरक्षित परती करण्यासाठी नासा प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुनीता विल्यम्सचा तिसऱ्यांदा अवकाशात

५९ वर्षीय सुनीता विल्यम्स या आधी दोनदा अंतराळात गेल्या आहेत. NASAच्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत अंतराळात ३२२ दिवस घालवले आहेत. २००६ मध्ये त्यांनी १९५ दिवस तर २०१२ मध्ये १२७ दिवस अंतराळात राहिल्या होत्या. २०१२ च्या मोहिमेची खास गोष्ट म्हणजे सुनीता विल्यम्स यांनी चार वेळा अंतराळाबाहेर येऊन काम केले होते. सुनीता विल्यम्स अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्याआधी कल्पना चावला या अंतराळात गेल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT