QR Code on Statue eSakal
विज्ञान-तंत्र

QR Code on Statue : तब्बल 3,000 वर्षांपूर्वीच्या मूर्तीवर दिसला QR कोड? व्हायरल होतोय फोटो

ही मूर्ती माया संस्कृतीच्या वेळीची असल्याचं म्हटलं जात आहे.

Sudesh

QR Code on 3000 year old Statue : आपला इतिहास आपल्याला बरंच काही शिकवतो असं म्हणतात. जगभरात कित्येक ठिकाणी उत्खननातून इतिहासाबाबत महत्त्वाची माहिती मिळत असते. मात्र कित्येक वेळा यामध्ये अशा गोष्टी आढळतात ज्यामुळे वैज्ञानिकही चक्रावून जातात.

अशाच एका पुरातन मूर्तीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. याला कारण म्हणजे, या मूर्तीमध्ये चेहऱ्याच्या जागी चक्क QR कोड सारखे डिझाईन दिसत आहे. ही मूर्ती तब्बल 3000 वर्षांपूर्वीची आहे, तरीही यावर क्यूआर कोड कसा दिसत आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.

ही मूर्ती एखाद्या व्यक्तीची आहे हे लक्षात येत आहे. कारण, या मूर्तीचे हात-पाय आणि इतर शरीर हे अगदी मानवाप्रमाणे आहे. मात्र या व्यक्तीच्या डोक्याच्या ठिकाणी क्यूआर कोड सारखी गोष्ट लावण्यात आली आहे. तीन हजार वर्षापूर्वीचे लोक आपल्यापेक्षा प्रगत होते का? अशी चर्चा या मूर्तीमुळे सुरू झाली आहे.

फेसबुकवर मिस्टेरियस वर्ल्ड नावाच्या पेजवरुन या मूर्तीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या पोस्टवर हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही मूर्ती माया संस्कृतीच्या वेळीची असल्याचंही म्हटलं जात आहे. माया संस्कृती ही इसवी सन पूर्व 1500 या काळामध्ये मेक्सिको, होंडुरास, ग्वाटेमाला आणि युकाटन या ठिकाणी पसरली होती.

यूजर्सच्या विविध प्रतिक्रिया

सोशल मीडिया यूजर्स या मूर्तीबाबत विविध प्रतिक्रिया दिसत आहेत. 'आपणही भविष्यात अशाच प्रकारे विलुप्त होऊन जाऊ शकतो', 'तेव्हाचे लोक कदाचित भविष्य पाहू शकत होते', 'माया संस्कृती किती प्रगत होती हे यातून दिसतं', तसंच 'हा कदाचित खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता असू शकतो' असंही मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT