E-Luna Esakal
विज्ञान-तंत्र

E-Luna : नवी पिढीही म्हणणार 'चल मेरी लूना'; इलेक्ट्रिक स्वरुपात परत येतेय प्रसिद्ध मोपेड

कंपनीच्या सीईओ सुल्लजा यांनी एका ट्विटर पोस्टमध्ये याबाबत संकेत दिले आहेत.

Sudesh

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात सामान्यांची लाडकी दुचाकी 'लूना आता पुन्हा एकदा बाजारात येणार आहे. मात्र, यावेळी ही गाडी इलेक्ट्रिक स्वरुपात आपल्या भेटीला येणार आहे. कंपनीच्या सीईओ सुल्लजा फिरोदिया मोटवानी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

बाजारात सध्या ई-बाईक्सची चलती आहे. नवनवीन कंपन्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या मार्केटमध्ये येत असताना, जुन्या मोठ्या कंपन्याही कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच बजाजने आपल्या चेतक स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केले होते. यानंतर आता लूनानेही या स्पर्धेत उडी घेतली आहे.

कंपनीच्या सीईओ सुल्लजा यांनी एका ट्विटर पोस्टमध्ये आपल्या वडिलांचा जुना फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ते लुना गाडीवर बसलेले दिसत आहेत. "ब्लास्ट फ्रॉम दि पास्ट! 'चल मेरी लूना' आणि ती बनवणारे माझे वडील पद्मश्री अरुण फिरोदिया! कायनॅटिक ग्रीनच्या मदतीने काहीतरी क्रांतिकारी आणि रोमांचक गोष्ट समोर येत आहे. तुम्ही बरोबर ओळखलं.. ही ई-लूना आहे." अशा आशयाची पोस्ट सुल्लजा यांनी केली आहे.

ई-लूना हे कायनॅटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स ग्रुपतर्फे लाँच करण्यात येणारे पहिलेच मॉडेल असेल. मीडिया रिपोर्टनुसार कंपनीने चेसिस आणि इतर पार्ट्सची निर्मिती देखील सुरू केली आहे. कंपनी दर महिन्याला ५ हजार युनिट्सची निर्मिती करेल, असं सांगण्यात येत आहे. हे लक्ष्य वेळेनुसार आणि गरजेनुसार वाढत जाईल. महाराष्ट्रातील अहमदनगर येथे या मॉडेलची निर्मिती होईल.

१९७२ मध्ये झाली होती लाँच

भारतामध्ये १९७२ साली कायनॅटिक इंजिनिअरिंगने तयार केलेली लूना लाँच करण्यात आली होती. अवघ्या ५० सीसी क्षमतेचं इंजिन असणारी ही मोपेड होती. यावेळी याची किंमत केवळ दोन हजार रुपये होती. यानंतर लुनाचे टीएफआर, डबल प्लस, विंग्स, मॅग्नम आणि सुपर असे बरेच व्हेरियंट समोर आणण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Kolhapur Circuit Bench : 'मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली'; निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचे मोठे विधान

Police Humanity: पुलाखाली हरवलेली ती.. अन् खाकीतील देवदूत; नावाच्या एका धाग्यावरून कऱ्हाड पोलिसांची कामगिरी; कुटुंबाकडे केले स्वाधीन..

Marathi News Live Updates : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुग्धशर्करा योग; त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

Government Schools in Maharashtra: सरकारी शाळा बंद करण्याचा घाट; अभिजित दीपकेंची टीका; ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू

SCROLL FOR NEXT