Google CEO Sundar Pichai announces a $15 billion investment to establish India’s first AI hub in Visakhapatnam, Andhra Pradesh, marking a major step toward India’s AI future.

 

esakal

विज्ञान-तंत्र

Google AI Hub India : सुंदर पिचाईंची मोठी घोषणा! गुगल भारतात ‘या’ राज्यात पहिलं ‘AI’ हब उभारणार

Sundar Pichai announces Google’s first AI Hub in India : तब्बल १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; पंतप्रधान मोदींशीही झाली चर्चा

Mayur Ratnaparkhe

Google’s First AI Hub to Be Established in Visakhapatnam : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज(मंगळवार) एक मोठी घोषणा केली. गुगल भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) हब बनवणार असल्याचं पिचाई यांनी जाहीर केलं आणि यासाठी तब्बल १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचीही यावेळी माहिती दिली.

सुंदर पिचाई यांनी सांगितले की, त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीह देखील चर्चा केली आहे. एका विशेष योजनेअंतर्गत आंध्र प्रदेशमधील विशाखापट्ट्णम येथे मोठे डेटा सेंटर आणि AI हब बनणार आहे.

संदुर पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याचा अतिशय चांगला अनुभव राहिला. आम्ही विशाखापट्टणम येथे बनणाऱ्या गुगलच्या पहिल्या एआय हबची योजना सादर केली. हे एक ऐतिहासिक पाऊल असेल. या हबमध्ये गिगावॅट स्तरीय संगणकीय क्षमता, एक आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे आणि मोठ्याप्रमाणात उर्जा पायाभूत सुविधांचा समावेश असेल.

गुगल भारतात तब्बल १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे. हे भारतासाठी एखाद्या जॅकपॉट पेक्षा कमी नाही. यामुळे भारताचा फार मोठा फायदा होणार आहे. १५ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये १,३३१.८५ अब्ज रुपये होतात. एवढ्या मोठ्याप्रमाणात गुंतवणूक देशात येणं हे भारतासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे.

गुगलचे हे पहिलेच एआय हब असणार आहे. ते यासाठी भारतामधील एआय अभियंत्यांना संधी देणार आहेत. गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन यांनी सांगितले आहे की, गुगल भारतात मागील २१ वर्षांपासून काम करत आहे आणि १४ हजार पेक्षा जास्त भारतीय त्याच्याशी जुडलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT