Sundar Pichai says Over 25% of Code Machine-Generated AI  esakal
विज्ञान-तंत्र

Sundar Pichai : सुंदर पिचाईंनी इंजिनियर्सना दिलं टेन्शन? 25% पेक्षा जास्त Google सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी होतो 'एआय'चा वापर

Google CEO Sundai Pichai AI use in Google coding : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकत्याच झालेल्या तिमाही आर्थिक अहवालात सांगितले की, गुगलच्या नव्या कोडिंगपैकी २५% पेक्षा जास्त कोड आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार केला जातो.

Saisimran Ghashi

Sundar Pichai : आधुनिक तंत्रज्ञानाचे युग विस्तारत असताना कृत्रिम बुद्धीमत्ता देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अश्यात गुगलच्या कोडिंग प्रक्रियेत आता AI चा वाढता वापर वाढला आहे अशी माहिती समोर आली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकत्याच झालेल्या तिमाही आर्थिक अहवालात सांगितले की, गुगलच्या नव्या कोडिंगपैकी २५% पेक्षा जास्त कोड आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार केला जातो. मात्र, हा कोड शेवटी अभियंत्यांकडून म्हणजेच इंजीनियर्सकडून तपासला जातो, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि ते अधिक जलद काम करू शकतात.

इंजिनियर्सच्या नोकऱ्यांना धोका?

पिचाई यांच्या मते, गुगलमधील AI वापर फक्त कोडिंग प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविण्यासाठीच आहे, त्यामुळे इंजिनियर्सच्या नोकऱ्यांना धक्का पोहोचणार नाही. उलट, इंजिनियर्सला AI च्या साहाय्याने अधिक प्रकल्प आणि नवकल्पना राबवता येतात.

AI च्या वापरामुळे कंपनीचे उत्पादन आणि कार्यक्षमता लक्षणीय वाढत आहे. गुगलने NVIDIA GPUs आणि स्वतःचे तयार केलेले Tensor Processing Units (TPUs) यांसारख्या AI accelerator साधनांचा वापर सुरू केला आहे.

हे साधन AI प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवतात. गुगलने सहाव्या जनरेशनचे TPUs म्हणजेच Trillium लॉन्च केले असून, त्यामुळे अधिक वेगवान आणि परिणामकारक AI प्रक्रिया होऊ शकते.अल्फाबेटच्या आर्थिक अहवालात उल्लेख आहे की, AI आणि जाहिरात व्यवसायाच्या यशामुळे कंपनीच्या उत्पन्नात १५% वाढ झाली आहे. कंपनीच्या नवीन AI साधनांमुळे ग्राहक आणि भागीदारांनाही फायदा होत आहे. या साधनांमुळे कोडिंग आणि अन्य कार्यप्रक्रियांमध्ये मोठी प्रगती साधता आली आहे.

याशिवाय, गुगल पर्यावरणपूरक ऊर्जेतही गुंतवणूक करत असून, जगभरात शाश्वत ऊर्जेसाठी अनेक प्रकल्प हाती घेत आहेत. कंपनीने नुकतेच लहान परमाणु ऊर्जा संयंत्रांद्वारे २४/७ कार्बन-फ्री ऊर्जेसाठी करार केला आहे, ज्यामुळे ५०० मेगावॉटपर्यंत ऊर्जानिर्मिती होईल.

गुगलच्या AI आणि शाश्वत ऊर्जेच्या गुंतवणुकीमुळे भविष्यातील तंत्रज्ञानाला गती मिळत आहे. AI आधारित कोडिंगमुळे कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन दिशानिर्देश दिले जात असून, भविष्यात AI व अभियंता यांचे सहकार्य तंत्रज्ञान क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT