NASA Confirms Sunita Williams Safe on ISS, Live Address Scheduled for July 10 esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams : जगाला सुनीता विल्यम्सच्या कॉलची प्रतीक्षा! उद्या रात्री पृथ्वीशी संवाद साधणार

NASA Update : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर 5 जूनला बोईंग स्टारलाईनर मधून अवकाश स्थानकावर गेले.परंतु त्यांच्या पृथ्वीवरील परतीस तांत्रिक अडचणीमुळे उशीर लागत आहे.

Saisimran Ghashi

Starliner Return : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विलमोर हे 5 जूनला बोईंग स्टारलाईनर मधून अवकाश स्थानकावर गेले होते. पण नासाच्या या मिशनवरून परतीच्या वेळेत विलंब झाल्यामुळे काळजी निर्माण झाली होती. या बाबतीत नासाने एक चांगली बातमी दिली आहे.

अंतराळवीर बोइंग स्टारलाइनर अंतराळ यानाने अवकाश भरारी घेण्यापूर्वीच हे मिशन काही कारणास्तव रद्द करण्यात आले होते. त्या नंतर हे अंतराळवीर अवकाश स्थानकावर पोहोचल्यानंतर अंतराळयानात तांत्रिक अडचणी आल्याने परतीच्या वेळेत तीन वेळा बदल करण्याची वेळ आली.

अंतराळ स्थान केंद्रावर सध्या ९ सदस्यीय अंतराळवीर दल कार्यरत आहे. सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी अंतराळ स्थान केंद्रावर एक महिन्यापेक्षा जास्त काळ घालवला आहे. ही वाढीव मुदत असून त्यांचे प्रारंभीक नियोजन केवळ १० दिवसांचे होते.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स अंतराळ स्थान केंद्रावर सुरक्षित असून 10 जुलैला रात्री ८:३० वाजता पृथ्वीशी संवाद साधणार आहेत,अशी माहिती नासाने दिली आहे.

सुनीता विलियम्स यांनी अंतराळ स्थान केंद्रावर गेल्या चार आठवड्यांत येणाऱ्या मोहिमांसाठी लागणारे उपकरण आणि सामान वेगळे करण्याचे काम केले आहे. त्यांनी अंतराळ स्थान केंद्राच्या फिल्टर्सची हवा वाहतुकीची देखरेखही केली.थोडक्यात, अंतराळातील अंतराळवीरांचे काम खूप महत्वाचे आहे.

सुनीता विलियम्स यांच्या परतीबद्दल वेगळवेगळ्या अफवा पसरत असताना नासाने दिलेल्या या माहितीमुळे भारतीयांना दिलासा मिळाला आहे.तसेच पुढच्या 45 दिवसांमध्ये अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येतील असा विश्वासही नासाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT