sunita williams return to earth latest update nasa esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams Update : सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परतणार नाही! नासाने धक्कादायक माहिती देत सांगितलं कारण

Sunita williams return to earth nasa changed date : नासा अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून परतीची मोहीम मार्च 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Saisimran Ghashi

Sunita Williams : नासा अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून परतीची मोहीम मार्च 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मूळत: आठ दिवसांची चाचणी मोहीम असलेल्या या प्रवासाचे रूपांतर आता नऊ महिन्यांच्या सहनशीलतेच्या प्रवासात झाले आहे.

5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाद्वारे सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांनी या मोहिमेसाठी प्रस्थान केले होते. मात्र, त्यांच्या यानाच्या थ्रस्टरच्या बिघाडासह हेलियम गळतीसारख्या तांत्रिक अडचणींमुळे नासाला सप्टेंबर महिन्यात स्टारलाइनरला रिकाम्या अवस्थेत परत पृथ्वीवर बोलवावे लागले. त्यामुळे विल्यम्स आणि विलमोर ISS वरच अडकले.

आता नासाच्या स्पेसएक्स क्रू-10 मोहिमेसाठी मार्च 2025 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. यामध्ये NASA, JAXA आणि रॉसकोस्मॉस संस्थांचे अंतराळवीर सहभागी होतील. सध्या ही टीम नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

नासाच्या वाणिज्यिक क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले की, नवीन ड्रॅगन अंतराळयान तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे.

स्पेसएक्सच्या सहाय्याने नासा क्रू-10 मोहिमेची तयारी करत आहे. दुसरीकडे, बोईंग स्टारलाइनरच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी ही काळजी घेतल्याचे स्पष्ट केले.

सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांचा फक्त आठ दिवसांचा हा प्रवास आता नऊ महिन्यांच्या दीर्घ मोहिमेत बदलला आहे. ही मोहीम अंतराळवीरांच्या सहनशीलतेचे आणि मानवाच्या अंतराळातील सर्जनशीलतेचे प्रतीक ठरली आहे. आता हे अंतराळवीर पृथ्वीवर कधी परत येणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT