Supreme Court Dismissed PIL Regulation of OTT Platforms esakal
विज्ञान-तंत्र

OTT Censorship : OTT प्लॅटफॉर्मवर लागणार सेन्सॉरशिपचे निर्बंध? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Supreme Court Dismissed PIL Censorship Regulation of OTT Platforms : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय म्हटले जाणून घ्या.

Saisimran Ghashi

OTT Platforms Regulations Plea : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली आहे. केंद्र सरकारला अशा प्रकारचे मंडळ स्थापन करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका (PIL) न्यायालयाने नाकारली, कारण हा विषय धोरणात्मक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण ठेवण्याचा विषय कार्यकारी यंत्रणेचा असून, यासाठी विविध हितधारकांशी व्यापक सल्लामसलत आवश्यक आहे. मुख्य न्यायाधीशांनी असेही नमूद केले की, आता बहुतेक PIL धोरणात्मक विषयांवर आधारित असल्यामुळे खऱ्या जनहिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते.

याचिका दाखल करणारे वकील शशांक शेखर झा यांनी त्यांच्या तक्रारींसह संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे जाण्याची परवानगी मागितली, मात्र न्यायालयाने याचिका थेट फेटाळून लावली.(Regulatory Body on OTT Platforms)

या याचिकेत नेटफ्लिक्सवरील "IC 814: द कंदाहार हायजॅक" या मालिकेचा संदर्भ देऊन अशा नियामक यंत्रणेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते. याचिकाकर्त्याने म्हटले होते की, सध्याच्या परिस्थितीत, ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या सामग्रीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, जसे की सिनेमॅटोग्राफ कायद्यानुसार सार्वजनिक चित्रपटांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) आहे.

सिनेमॅटोग्राफ कायद्यानुसार चित्रपटांवर कडक प्रमाणपत्र प्रक्रिया लागू केली जाते, पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या सामग्रीसाठी मात्र कोणतेही बाह्य नियंत्रण नाही. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म केवळ स्वनियमनावर आधारित आहेत, परंतु हे नियम योग्य प्रकारे पाळले जात नाहीत, असे याचिकाकर्त्याने सांगितले.

भारतात सध्या ४० हून अधिक ओटीटी आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नागरिकांना विविध स्वरूपात सामग्री उपलब्ध करून देत आहेत, ज्यात सशुल्क, जाहिराती असलेली आणि मोफत सामग्रीचा समावेश आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT