Swiggy Instamart Free Delivery Offer esakal
विज्ञान-तंत्र

Swiggy Free Delivery : खुशखबर! स्विगी इंस्टामार्ट खरेदीवर पुढचा महिनाभर मिळणार फ्री डिलिव्हरी,काय आहे खास ऑफर? लगेच पाहा

Swiggy Instamart Free Delivery Offer : स्विगीच्या इंस्टामार्टवर आता 24 तास, 7 दिवस मोफत डिलीव्हरी मिळणार आहे.

Saisimran Ghashi

Swiggy Instamart Free Delivery : स्विगीच्या इंस्टामार्टवर आता 24 तास, 7 दिवस मोफत डिलीव्हरी मिळणार आहे. होय, तुम्ही वाचालं ते बरोबर आहे. आता घरातील गरजेच्या वस्तूंपासून सणासुदीच्या खरेदीपर्यंत सगळं काही मिनीटांत तुमच्या दारापर्यंत पोहोचेल तेही अगदी मोफत.

रात्री उशिरा का असेना किंवा पहाटे सकाळी, स्विगी इंस्टामार्ट तुमच्या मदतीला धावून येणार आहे. दिल्ली, गुडगाव आणि नोएडाच्या रहिवाशांना, आता तुम्हाला किराणा माल, स्नॅक्स किंवा इतर वस्तूंच्या डिलीव्हरीसाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.ही ऑफर लवकरच मुंबईमध्ये देखील सुरू होणार आहे अशा लिक्स आहेत.

स्विगीने ही 24x7 मोफत डिलीव्हरी खासकरून सणासुदीच्या काळात लोकांच्या वाढत्या मागणी आणि शेवटच्या क्षणी लागणार्‍या वस्तूंच्या गरजेवरून सुरू केली आहे. आता तुम्हाला किराणा माल, सणासुदीच्या मिठाईपासून इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी आणि भेटवस्तूंपर्यंत सर्व काही या स्वॅपवर मिळणार आहेत. म्हणजेच, आता सणासुदीत अचानक एखादी वस्तू संपली तरी काळजी करण्याची गरज नाही. तुमचे उत्सव निर्विघ्न पार पडतील याची स्विगी हमी देते.

स्विगीच्या माहितीनुसार, रात्रीच्या उशिराच्या वेळी लोकांच्या ऑर्डरमध्ये काही खास ट्रेंड दिसून आले आहेत. रात्री 11 ते 6 या वेळेत लोकांकडून चिप्स, भुजिया, आइसक्रीम सारख्या स्नॅक्सची मोठ्या प्रमाणात ऑर्डर येते. याशिवाय, रात्रीच्या वेळी इतर लोकप्रिय वस्तूंमध्ये डेअरी उत्पादने आणि पान मसाला यांचा समावेश आहे. रात्री संपून दिवस उगवताना ऑर्डरमध्ये बदल होतो. पहाटेच्या वेळी लोकांकडून दूध आणि अंडी यासारख्या नाश्त्याच्या वस्तूंची ऑर्डर जास्त येते.

या 24x7 मोफत डिलीव्हरीच्या धमाकेदार लाँचनिमित्त स्विगी इंस्टामार्टने एक सुंदर जाहिरातही बनवली आहे.

या जाहिरातीमध्ये लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट "ओये लकी लकी ओये" मधील गाणं वापरून स्विगी कशी तुमच्या इच्छा आणि गरजा 24 तास पूर्ण करू शकते हे दाखवण्यात आलं आहे. जाहिरातीत आणखी आकर्षण वाढवण्यासाठी स्विगीने बियाॅन्ड स्नॅक्स कंपनीसोबत करार केला असून त्यांच्या केळीच्या चिप्स दाखवल्या आहेत. ही जाहिरात तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.

स्विगी इंस्टामार्टच्या या नवीन ऑफरमुळे दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशांसाठी ही सेवा सुरू होणार आहे. लवकरच ही सुविधा भारतभर सुरू होऊ शकते. किराणा मालापासून स्नॅक्सपर्यंत शेवटच्या क्षणी लागणार्‍या भेटवस्तूंपर्यंत सर्व काही आता फक्त मोबाइलच्या काही टॅप्स अंतरावर आहे तेही मोफत डिलीव्हरीसह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : स्वातंत्र्य दिनीच मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Updates : पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलन

'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत

Independance Day Photos : 15 ऑगस्ट 1947 ला कसा साजरा झालेला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन? 10 फोटो पाहून म्हणाल, हिंदुस्थान ज़िंदाबाद!

Maharashtra Government : जमीन मोजणीला मिळणार गती; भूमी अभिलेख विभागाला १२०० रोव्हर खरेदीस मान्यता

SCROLL FOR NEXT