Swiggy One Lite eSakal
विज्ञान-तंत्र

Swiggy One Lite : आता स्विग्गीवरुन फूड ऑर्डर करणं होणार आणखी स्वस्त; कंपनीने लाँच केला 99 रुपयांचा खास प्लॅन

यामध्ये फ्री डिलिव्हरी आणि बरेच डिस्काउंट ऑफर्स देण्यात येत आहेत.

Sudesh

आजकाल ऑनलाईन फूड ऑर्डर करणे ही अगदी सामान्य बाब झाली आहे. मात्र, कित्येक वेळा डिलिव्हरी फी पाहून बरेज जण ऑनलाईन फूड ऑर्डर करणं टाळतात. अशाच ग्राहकांसाठी स्विग्गी कंपनीने एक खास सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे.

स्विग्गीने वन लाईट मेंबरशिप सुरू केली आहे. यामध्ये फ्री डिलिव्हरी आणि बरेच डिस्काउंट ऑफर्स देण्यात येत आहेत. 99 रुपयांचा हा प्लॅन तीन महिन्यांसाठी असणार आहे. नियमित किंवा वारंवार फूड ऑर्डर करणाऱ्या व्यक्तींसाठी हा प्लॅन अगदीच फायद्याचा ठरणार आहे.

स्विग्गी वन लाईट मेंबरशिप घेतलेल्या यूजर्सना 149 रुपयांहून अधिक किंमतीच्या ऑर्डरवर 10 फ्री डिलिव्हरीज मिळतील. तसंच 199 रुपयांहून अधिक किंमतीच्या इंस्टामार्ट ऑर्डरवर 10 फ्री डिलिव्हरीज मिळणार आहेत. यासोबतच, यूजर्सना 20 हजारांहून अधिक रेस्टॉरंटमध्ये 30 टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. या मेंबर्सना 60 रुपयांहून अधिक किंमतीच्या स्विग्गी जिनी डिलिव्हरीवर 10 टक्के सूटही मिळणार आहे.

'स्विग्गी वन'चं दुसरं व्हर्जन

स्विग्गीने यापूर्वीच आपल्या ग्राहकांसाठी 'स्विग्गी वन' ही सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. याचंच परवडणारं व्हर्जन म्हणजे स्विग्गी वन लाईट आहे. 99 रुपयांच्या सबस्क्रिप्शनमुळे यूजर्सना कमीत कमी 500 ते 600 रुपयांचा फायदा होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT