Swiggy Mental Harassment eSakal
विज्ञान-तंत्र

Swiggy Mental Harassment : स्विग्गीने ऑर्डर कॅन्सल केल्यामुळे झाला 'मानसिक त्रास'; कोर्टाने कंपनीला झापलं! ग्राहकाला मिळणार 'इतक्या' रुपयांची भरपाई

Consumer Court : कंपनीने ऑर्डर कॅन्सल केल्याबद्दल आधी सांगितलं नाही, तसंच त्यांनी रिफंड देखील पूर्ण दिला नाही यामुळे कानडे यांनी कंझ्युमर डिस्प्युट रिड्रेसल कमिशनकडे तक्रार दाखल केली.

Sudesh

Consumer Court on Swiggy : ऑनलाईन फूड डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्विग्गी अ‍ॅपला गुजरातमधील कंझ्यूमर कोर्टाने दणका दिला आहे. ऑर्डर कॅन्सल केल्यामुळे एका ग्राहकाला मानसिक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे या ग्राहकाला 1,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार हे प्रकरण 2022 सालचं आहे. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या प्रसाद कानडे या व्यक्तीने स्विग्गीवरुन मिठाई ऑर्डर केली होती. यासाठी त्यांनी एकूण 549 रुपये पे केले होते. मात्र स्विग्गीने ही ऑर्डर कॅन्सल केली. कानडे यांनी याबाबत तक्रार केल्यावर कंपनीने त्यांना 445 रुपये रिफंड केले होते.

कंपनीने ऑर्डर कॅन्सल केल्याबद्दल आधी सांगितलं नाही, तसंच त्यांनी रिफंड देखील पूर्ण दिला नाही यामुळे कानडे यांनी कंझ्युमर डिस्प्युट रिड्रेसल कमिशनकडे तक्रार दाखल केली. न्यायालात स्विग्गीने असा दावा केला, की हा रेस्टॉरंट आणि ग्राहक यांच्यातील प्रश्न आहे. स्विग्गी केवळ डिलिव्हरी पार्टनर असल्यामुळे त्यांना जबाबदार ठरवलं जाऊ नये. तसंच, कानडे यांनी स्वतःच ही ऑर्डर कॅन्सल केली होती असंही स्विग्गीने म्हटलं.

कोर्टाने काय म्हटलं?

कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेत, कानडे यांच्या बाजूने निकाल दिला. स्विग्गी डिलिव्हरी पार्टनर असले तरी त्यांनी पेमेंट रिसीव्ह केलं आहे. त्यामुळे तेदेखील याप्रकरणी जबाबदार आहेत असं मत कोर्टाने नोंदवलं. स्विग्गीने ग्राहकाच्या रिफंडमधील उर्वरित रक्कम - 104 रुपये ही 9% व्याजाने त्या व्यक्तीला परत करावी. सोबतच, त्यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी अधिक 1,000 रुपये देखील द्यावेत असे आदेश न्यायालयाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT