Chandrayaan 3 Gold Model eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : तामिळनाडूतील कलाकाराने बवनलं सोन्याचं 'चांद्रयान-3'; इस्रोला दिल्या अनोख्या शुभेच्छा! पाहा व्हिडिओ

ISRO Moon Mission : मरिप्पन या कलाकाराने चार ग्रॅम सोन्याचा वापर करुन हे मिनिएचर मॉडेल तयार केलं आहे.

Sudesh

ISRO Chandrayaan 3 Update : 'चांद्रयान-३' मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. ही महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वी व्हावी यासाठी जगभरातून इस्रोला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

यातच तामिळनाडूमधील एका कलाकाराने चक्क सोन्यापासून 'चांद्रयान-3'चं मॉडेल तयार केलं आहे. मरिप्पन असं या कलाकाराचं नाव आहे. चार ग्रॅम सोन्याचा वापर करुन त्याने हे मिनिएचर मॉडेल तयार केलं आहे. केवळ 1.5 इंच एवढ्या आकाराचं हे मॉडेल आहे.

"एखादी महत्त्वाची घटना घडत असल्यास, मी नेहमीच सोन्याने असे मिनिएचर मॉडेल बनवतो. 'चांद्रयान-3'चं लँडिंग हा प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. या मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व वैज्ञानिकांसाठी मी हे मॉडेल तयार केलं आहे. 4 ग्रॅम सोन्यापासून हे मॉडेल तयार करण्यासाठी मला 48 तास लागले."; असं मरिप्पनने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. (ISRO Moon Misson)

व्हिडिओ व्हायरल

मरिप्पन यांच्या चांद्रयान-3 च्या मॉ़डेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. चांद्रयानाचं हे मॉडेल एका पांढऱ्या चेंडूवर ठेऊन, त्यांनी चांद्रयानाचं यशस्वी लँडिंग झाल्याचंही दाखवलं आहे.

कधी होणार लँडिंग?

दरम्यान, चांद्रयान-3 हे लँडिंगसाठी सज्ज झालं असून; 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 वाजता ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT