Tata Altroz CNG And Punch CNG esakal
विज्ञान-तंत्र

Tata Altroz CNG And Punch CNG : आता टाटा पंच आणि अल्ट्रोझ येणार इलेक्ट्रिक-सीएनजी अवतारात

टाटा अल्ट्रोझ हॅचबॅक आणि पंच मायक्रो एसयूव्ही मॉडेल सीएनजी व्हेरियंट आणि इलेक्ट्रिक व्हेरियंट मिळणार

सकाळ डिजिटल टीम

Tata Altroz CNG And Punch CNG : आता टाटा अल्ट्रोझ हॅचबॅक आणि पंच मायक्रो एसयूव्ही मॉडेल सीएनजी व्हेरियंट आणि इलेक्ट्रिक व्हेरियंट मिळणार आहेत. या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये दोन्ही कारच्या CNG व्हर्जन्सचं प्रदर्शन लावण्यात आलं होतं.

गाडीतला बूट स्पेस वाचवण्यासाठी मागच्या बाजूला ड्युअल सिलेंडर लेआउट सेटअप करण्यात आलाय. आणि ही खरं तर जमेची बाजू आहे. यामध्ये इंजिन कंट्रोल युनिट म्हणजेच ईसीयू आणि डायरेक्ट स्टेट सीएनजी आहे.

या मॉडेलला फर्स्ट-इन-सेगमेंट लीकेज डिटेक्शन टेक्नॉलॉजी मिळते. कारमध्ये जर गॅस गळती होते आहे असं वाटलं तर टेक्नोलॉजीने कार पेट्रोल मोडवर स्विच होऊ शकते. Tata Altroz ​​CNG आणि पंच CNG वरील पॉवरट्रेन सेटअपमध्ये 1.2L पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी-फिट केलेल्या CNG किटचा समावेश आहे. हे 77PS ची पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. यात ट्रान्समिशन ड्युटीसाठी 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी आणि पंच सीएनजी

पेट्रोल मॉडेलप्रमाणे सीएनजी व्हेरियंटमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिक सनरूफ, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि प्रोजेक्टर मिळण्याची शक्यता आहे. टाटा पंच EV 2023 ऑटो एक्सपोमध्ये लाँच करण्यात आली होती.

ऐन सणासुदीच्या मुहूर्तावर ही कार विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. हे मॉडेल अल्फा प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि यात टाटाची झिप्टट्रॉन पॉवरट्रेन मिळण्याची शक्यता आहे. Nexon EV प्रमाणे, इलेक्ट्रिक मिनी SUV मध्ये दोन बॅटरी पॅक मिळू शकतात.

या नव्या इलेक्ट्रिक व्हर्जनला त्याच्या ICE मॉडेलपेक्षा वेगळे बंपर, नवीन चाके आणि रंग दिला जाईल. Tata Altroz ​​EV पुढील वर्षी येण्याची अपेक्षा आहे. कारमध्ये पॉवरट्रेन आणि डिझाइन बदल देखील मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT