Tata Altroz  esakal
विज्ञान-तंत्र

लवकरच येतंय Tata Altroz चे नवीन व्हेरिएंट, काय असेल खास? वाचा

सकाळ डिजिटल टीम

टाटाची नवीन कार खरेदीचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी 21 मार्च रोजी आपल्या लोकप्रिय प्रिमियम हॅचबॅक अल्ट्रोझचे DCT ऑटोमॅटिक व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने या आगामी कारचे प्री-बुकिंगही सुरू केले आहे. तुम्ही 21,000 रुपयांची टोकन रक्कम भरून अधिकृत टाटा डीलरशिपवरून नवीन ऑटोमॅटिक अल्ट्रोझ बुक करू शकता. असे मानले जात होते की कंपनी Altroz ​​च्या 1.2-लीटर टर्बो प्रकारासह DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) ऑफर करेल, परंतु आता तसे झाले नाही.

मिळेल 3-सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन

Altroz ​​चे हे व्हेरिएंट थोडे महाग होणार आहे. कंपनी 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स 1.2-लिटर 3-सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनला जोडणार आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स असलेले हे इंजिन 113Nm टॉर्कसह 86bhp पॉवर जनरेट करते. डीसीटी व्हेरिएंट देखील तीच पावर जनरेट करेल अशी अपेक्षा आहे.

मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम

खास गोष्ट म्हणजे कंपनी अल्ट्रोज डीसीटी ऑटोमॅटिक डार्क एडिशन देखील देईल. याशिवाय, कंपनी नवीन व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलमध्ये एक मोठी आणि अधिक आधुनिक टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ऑफर करणार आहे. आत्तापर्यंत, कंपनी सध्याच्या Altroz ​​मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देत आहे.

किंमत 1 लाख रुपये जास्त?

Automatic Altroz ​​नियमित मॅन्युअल व्हर्जनपेक्षा 1 लाख रुपयांनी महाग होऊ शकते. आत्तापर्यंत, या हॅचबॅकची किंमत 5.99 लाख ते 9.69 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या iTurbo आवृत्तीची किंमत 8.1 लाख ते 9.4 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT