Tata IPhone
Tata IPhone  esakal
विज्ञान-तंत्र

Tata IPhone : आता टाटाही तयार करणार आयफोन, किंमतीत होणार का घट?

सकाळ डिजिटल टीम

Tata IPhone : आयफोन वापरणे आजही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे त्याची असलेली किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागत होती, परंतु आता भारतीयांना एक मोठी भेट मिळणार आहे आणि आता आयफोन खरेदी करणे स्वस्त होणार आहे.

आता आयफोनचे उत्पादन भारतातील प्रतिष्ठित कंपनी टाटा (Tata iPhone) यांच्याकडे त्याची कमान येणार आहे, टाटा लवकरच भारतात आयफोन तयार करण्यासाठी नवीन उत्पादन प्लांट खरेदी करणार आहे. हा प्रोडक्शन प्लांट मिळाल्यानंतर आयफोनची निर्मिती भारतातच केली जाईल.

त्यामुळे त्यांचे आयात शुल्क कमी होईल आणि भारतीय ग्राहकांना ते खरेदी करण्यासाठी सध्या पेक्षा कमी रक्कम मोजावी लागणार आहे. टाटा समूह एप्रिलच्या अखेरीस विस्ट्रॉनचा आयफोन प्लांट (wistron iphone manufacturing company) ताब्यात घेणार आहे. त्यानंतर टाटा कंपनी आयफोनचे उत्पादन सुरू करेल.

विस्ट्रॉनमधून होऊ शकते कर्मचारी कपात

अहवालानुसार, टाटा समूहाने प्लांटमध्ये आधीच संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. संपादन प्रक्रियेचा एक भाग म्हणून कारखाना सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. सुमारे चारशे मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांनाही कमी केले जाऊ शकते. असे म्हटले जात आहे की टाटा समूह या करारानंतर आयफोन 15 बनवण्यास सुरुवात करेल. विस्ट्रॉनचा भारतीय प्लांट सध्या iPhone 12 आणि iPhone 14 चे उत्पादन करत आहे.

टाटाने बेंगळुरू प्लांट ताब्यात घेतल्यानंतर, विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल कारण भारतात ऍपल उत्पादनांचे उत्पादन करणारा हा एकमेव प्लांट होता. ऍपल उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ अंदाजे 600 दशलक्ष डाॅलर्स इतकी आहे. या व्यव्हाराकडे एक महत्त्वपूर्ण विकास म्हणून पाहिले जात आहे, विशेषत: अशा वेळी जेव्हा Apple चीनमधून उत्पादनासाठी भारताकडे पाहात आहे.

आयफोन 15 च्या निर्मितीपासून करणार श्रीगणेश

टाटा कंपनी भारतात आयफोन 15 चे उत्पादन सुरू करणार आहे. एका अंदाजानुसार आयफोन 15 ची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली जाऊ शकते. टाटा कंपनीने नेहमीच गुणवत्तेची विशेष काळजी घेतली आहे, अशा परिस्थितीत भारतीय ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब आहे. प्लांट टेकओव्हर पूर्ण होताच, आयफोन 15 चे उत्पादन भारतात सुरू होईल आणि लॉन्च झाल्यानंतर, भारतीय ग्राहकांना खरेदी करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : तर सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणार... बॉडीगार्डनं जीवन संपवल्यानंतर बच्चू कडूंनी साधला निशाणा

Silver Price Update : चांदीचे दर गगनाला भिडले! इराण अन् सौदीत टेन्शन वाढल्याने १ लाखाच्या वर जाणार किंमत

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण? किती आहे संपत्ती

Latest Marathi News Live Update : इगतपुरीच्या भावली धरणात 5 जणांचा बुडून दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT