Tata Price Hike eSakal
विज्ञान-तंत्र

Tata Price Hike : टाटाची कार घ्यायची असेल तर करावी लागणार घाई; एक फेब्रुवारीपासून वाढणार किंमती

टाटाने म्हटलं, की उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, काही प्रमाणात दरवाढ करणं गरजेचं आहे.

Sudesh

Tata Motors Price Hike from February : भारतातील अग्रगण्य वाहन निर्माती कंपनी टाटाने एक मोठी घोषणा केली आहे. टाटाच्या सर्व गाड्यांच्या किंमती एक फेब्रुवारीपासून वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. यामुळे टाटाच्या प्रसिद्ध Nexon, Tiago, Punch आणि इतर सर्व गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत.

किती वाढणार किंमती?

टाटाने दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2024 पासून कंपनीच्या सर्व पॅसेंजर कार्सच्या किंमती 0.7 टक्क्यांनी वाढणार आहेत. टाटाच्या एकूण ग्लोबल सेलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 9 टक्क्यांनी वाढ दिसून आली. कमर्शिअल व्हेईकल्सच्या विक्रीत एक टक्का वाढ होती, तर पॅसेंजर कार्स सेगमेंटमध्ये ही वाढ पाच टक्के एवढी होती. याच कालावधीमध्ये जॅग्वार लँड रोव्हरच्या विक्रीमध्ये तब्बल 27 टक्क्यांनी वाढ दिसून आली. न्यूज18 ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

टाटाने म्हटलं, की उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, काही प्रमाणात दरवाढ करणं गरजेचं आहे. गाड्यांच्या मॉडेलनुसार दरवाढीचं प्रमाण हे वेगवेगळं असणार आहे, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. यापूर्वी टाटाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दरवाढीची घोषणा केली होती. ही दरवाढ 2023 च्या मे महिन्यापासून लागू केली होती.

मारूतीनेही वाढवल्या किंमती

टाटासोबतच इतर कार कंपन्यांनी देखील आपल्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. मारुती सुझूकीने 16 जानेवारी रोजी आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT