tata punch google
विज्ञान-तंत्र

Tata च्या कार महागणार; कंपनीने जाहीर केली दरवाढ, पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. गाड्यांची ही वाढलेली किंमत 19 जानेवारीपासून लागू होणार आहे. कंपनीने म्हटले आहे की व्हेरिएंट आणि मॉडेलच्या आधारावर सरासरी 0.9 टक्के वाढ होईल. काही ठरावीक व्हेरिएंटच्या किंमती 10,000 रुपयांपर्यंत कमी देखील केल्या आहेत. एकूण इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे टाटाला त्यांच्या वाहनांच्या किमतीत किरकोळ वाढ करावी लागली आहे. मात्र वाढलेल्या किमतीचा 18 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या टाटा कारवर कोणताही परिणाम होणार नाही.

Tata Tiago आणि Tigor चे CNG व्हेरिएंट

Tata Motors आज भारतात आपल्या CNG रेंज कार लॉन्च करणार आहे. कंपनी Tiago आणि Tigor चे e-CNG प्रकार सादर करू शकते. या लॉन्चनंतर, टाटा मोटर्स पेट्रोल कारचे सीएनजी प्रकार सादर करून मारुती सुझुकी आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. टाटाच्या आगामी सीएनजी कार फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी किटसह येतील ज्यानंतर ग्राहक त्या पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालवू शकतील. या दोन्ही सीएनजी कारला कोणतेही कॉस्मेटिक अपडेट मिळण्याची शक्यता नाही.

सध्या, मारुती सुझुकी लोकप्रिय कार अल्टो, वॅगनआर, सेलेरियो फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी किटसह विकल्या जातात दुसरीकडे, ह्युंदाई देखील फॅक्टरी फिट सीएनजी किटसह सॅन्ट्रोची विक्री करते. सीएनजी सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सच्या प्रवेशानंतर भारतात सीएनजी कारची विक्री आणखी वाढणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन उपाय म्हणून CNG चा वापर करण्यावरही भारत सरकार भर देत आहे. यासोबतच, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे भारतातील सीएनजी वाहनांची मागणी वाढली आहे. यामुळेच भारतातील ऑटो कंपन्या त्यांच्या लोकप्रिय वाहनांचे सीएनजी प्रकार देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT