टाटा मोटर्स 
विज्ञान-तंत्र

टाटा मोटर्सचा ग्राहकांना धक्का! वाहनांबाबत केली 'ही' घोषणा

'मारुती'नंतर टाटा मोटर्सचा ग्राहकांना धक्का! वाहनांबाबत केली 'ही' घोषणा

सकाळ वृत्तसेवा

मारुती सुझुकीनंतर आता टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

मारुती सुझुकीनंतर (Maruti Suzuki) आता टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत वाहन क्षेत्रातील प्रमुख टाटा मोटर्स 1 जानेवारीपासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या (Vehivles) किमती 2.5 टक्‍क्‍यांनी वाढवणार आहे. वस्तूंच्या किमतीत आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सोमवारी शेअर बाजारांना सांगितले की, व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा हा निर्णय सर्व श्रेणींना लागू असेल. मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने, मध्यवर्ती आणि हलकी व्यावसायिक वाहने, लहान व्यावसायिक वाहने आणि बसेसच्या किमतीही वाढतील.

टाटा मोटर्सने म्हटले आहे की, पोलाद, ऍल्युमिनियम आणि इतर मौल्यवान धातूंच्या किमती वाढण्याबरोबरच इतर कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा मोठा भार कंपनीवर पडत आहे आणि आता वाहनांच्या किमती वाढवून त्याचा काही भार ग्राहकांवर टाकावा लागत आहे. यापूर्वी मारुती सुझुकी, मर्सिडीज-बेंझ आणि ऑडी या कंपन्यांनीही पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

टोयोटा किर्लोस्करचा वित्तपुरवठ्यासाठी कर्नाटक बॅंकेशी करार

टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने देशभरात त्यांच्या वाहनांना वित्तपुरवठा करण्यासाठी कर्नाटक बॅंकेसोबत भागीदारी केली आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहनांच्या खरेदीदारांना वित्तपुरवठा करण्यासाठी कर्नाटक बॅंकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानंतर, कर्नाटक बॅंक TKM वाहनांच्या खरेदीच्या वेळी वित्तपुरवठा करण्यासाठी प्राधान्य देणारी कर्जदार बनेल.

TKM चे उपाध्यक्ष (स्ट्रॅटेजिक बिझनेस) आर वेंकटकृष्णन म्हणाले की, या करारानंतर ग्राहकांना कंपनीच्या वाहनांच्या खासगी आणि व्यावसायिक खरेदीच्या वेळी स्पर्धात्मक दरात वित्तपुरवठा करता येईल. यामुळे कंपनीला ग्रामीण बाजारपेठेतही आपला मार्केट सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. कर्नाटक बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ महाबळेश्वर एम. एस. म्हणाले की, टोयोटा वाहने खरेदी करताना ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर्ज मिळविण्यासाठी खूप सुविधा मिळेल.

मारुती कार महाग होणार

मारुती सुझुकीने एक्‍सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनीने या अतिरिक्त खर्चातील काही भार दरवाढीद्वारे ग्राहकांवर घालणे अत्यावश्‍यक बनते. कंपनीने वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किमती सातत्याने वाढवल्या आहेत. कंपनीने या वर्षी मार्च, जुलै आणि सप्टेंबरमध्ये दरवाढीची घोषणा केली होती.

नुकतीच इकोच्या किमतीत 8000 रुपयांनी वाढ

मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या व्हॅन Eeco ची किंमत 8,000 रुपयांनी वाढवली आहे. इकोमध्ये एअरबॅग जोडल्यामुळे ही वाढ झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये मारुती सुझुकीच्या विक्रीत मोठी घसरण झाली

या वर्षी नोव्हेंबरमध्ये मारुती सुझुकीची एकूण 1,39,184 युनिट्‌सची विक्री झाली. त्याच वेळी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते 1,53,223 युनिट होते. जागतिक चिप तुटवड्यामुळे उत्पादनात घट झाल्याने विक्रीतही घट झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री 1,13,017 युनिट्‌स होती. त्याच वेळी, इतर OEM ची विक्री 4,774 युनिट्‌सवर होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Reel star Akkya Bansode: “थांब, तुझा आज गेमच करतो...” पुण्यात रिल स्टारवर धारधार शस्त्राने कसा झाला हल्ला, कोण आहे अक्क्या बनसोडे?

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

SCROLL FOR NEXT