Tata Play Binge OTT Plans Explained esakal
विज्ञान-तंत्र

TATA Play Binge : 34 OTT ॲप्सचा खजिना फक्त 149 रुपयांपासून, अजून काय हवंय? ; टाटा प्ले बिंजची धमाका ऑफर!

TATA Play Binge OTT Platforms Subscription Plan : टाटा प्ले बिंजने वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत स्वस्त ओटीटी प्लॅन लाँच केले आहेत.

Saisimran Ghashi

Free OTT Subscription : खाजगी नेटवर्क कंपन्यांनी जुलैमध्ये रीचार्जचे दर वाढवल्यानंतर ग्राहक अन्य स्वस्त नेटवर्ककडे वळत आहेत.त्यानंतर काही नेटवर्क कंपन्या आकर्षक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहेत. ज्यामध्ये OTT सब्स्क्रिप्शनदेखील असेल.अशात टाटा प्ले बिंजने वापरकर्त्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्ही 149 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅन्समध्ये 34 OTT ॲप्सचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हीदेखील ओटीटीवरील मनोरंजनाचे प्रेमी आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. टाटा प्ले बिंजने आपल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत स्वस्त प्लॅन लाँच केले आहेत.

सर्वात स्वस्त प्लॅन फक्त 149 रुपयांचा

टाटा प्ले बिंजच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन फक्त 149 रुपयांचा आहे. याशिवाय कंपनी 199 आणि 349 रुपयांचे प्लॅन देखील ऑफर करत आहे. या सर्व प्लॅन्सची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला यात Apple TV+ चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

या प्लॅन्सची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही हे प्लॅन तुमच्या टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाइलवर वापरू शकता. म्हणजेच, तुम्ही कुठेही असलात तरी तुमच्या आवडत्या शो आणि चित्रपटंचा आनंद घेऊ शकता.

कशा प्रकारचे ॲप्स उपलब्ध आहेत?

टाटा प्ले बिंजच्या प्लॅन्समध्ये तुम्हाला Disney+ Hotstar, Zee5, Sony Liv, Lionsgate Play, Hungama, Chaupal आणि अनेक लोकप्रिय OTT ॲप्सचा आनंद घेता येईल.

टाटा प्ले बिंजने आपल्या वापरकर्त्यांसाठी खरोखरच एक आकर्षक ऑफर दिली आहे. जर तुम्हीही OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेण्याचे चाहते असाल तर टाटा प्ले बिंज तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

कसा निवडाल प्लॅन?

टाटा प्ले बिंज तुमच्यासाठी तीन प्रकारचे प्लॅन ऑफर करत आहे.

फ्लेक्सिलाइट प्लॅन (149 रुपये): या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक OTT ॲप्स मिळतील, पण तुम्ही त्यापैकी फक्त चार ॲप्स निवडू शकता.

बेस्टसेलर फ्लेक्सी प्लस प्लॅन (199 रुपये): या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्लेक्सिलाइट प्लॅनपेक्षा अधिक ॲप्स मिळतील.

मेगा व्हॅल्यू प्लॅन (349 रुपये): हा प्लॅन सर्वात महाग असला तरी यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त 34 ॲप्स मिळतील.

टाटा प्ले बिंजचा कोणताही प्लॅन घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या नजीकच्या टाटा प्ले स्टोरला जाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT