Safari Dark Edition 
विज्ञान-तंत्र

टाटाची SUV Safari चे डार्क एडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

सकाळ डिजिटल टीम

Safari Dark Edition : टाटा मोटर्सने (Tata Motors) सफारी डार्क एडिशन (Safari Dark Edition) लाँच केले आहे. जी कंपनीच्या डार्क एडिशन रेंजमधील लेटेस्ट फ्लॅगशिप एडिशन आहे. यासाठी बुकिंग सुरू झाले असून, या SUV ची किंमत 19.05 लाख रुपयांपासून सुरु होत आहे.

सफारी डार्क एडिशनचे एक्सटीरियर बॉडी कलर 'ओबेरॉन ब्लॅक' आहे, जो टाटाच्या डार्क एडिशन रेंजचा प्रमुख भाग आहे. फेंडर्स आणि टेलगेटवरील मॅसकॉट, 18-इंच 'ब्लॅकस्टोन' अलॉय व्हील्स सफारी डार्क एडिशनला आणखी सुंदर बनवतात.

इंजिनमध्ये कास काय असणार?

Tata Safari Dark Edition मध्ये सर्व व्हेरिएंटमध्ये XT+, XTA+, XZ+ आणि XZA+ 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. हे 170 bhp ची पॉवर आणि 350 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येईल. SUV ला तीन ड्रायव्हिंग मोड्स सिटी, स्पोर्ट्स, इको देखील देण्यात येतील

इंटिरियर कसे असेल?

इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, केबिनमध्ये ऑल-ब्लॅक थीम ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे याला बोल्ड लुक मिळतो. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत वेंटिलेटेड सीट उपलब्ध असतील. याशिवाय एअर प्युरिफायर, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले आणि वाय-फाय सारखे फीचर्सही उपलब्ध असतील. टाटा सफारी डार्क एडिशनवरील ब्लॅकस्टोन अलॉय व्हील्स सर्व ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये आहेत. हे क्रोम फिनिशमध्ये टाटा मोटर्सचे लोगो देण्यात आले आहेत. गाडीचा उर्वरित रंग ऑबोरोन ब्लॅक आहे. सफारीच्या बेस मॉडेलला क्रोम फिनिशिंग देण्यात येते.

एक्स्टीरियर

गाडीच्या हेडलॅम्पच्या बाजूला, समोरच्या ग्रिलवर दिलेले क्रोम फिनिश, Dark Edition च्या ग्लॉसी काळ्या रंगात देण्यात आले आहेत. अलॉय व्हील ब्लॅकस्टोन लूकमध्ये आहेत, ज्यामुळे ते बाकीच्या टाटा डार्क रेंजपेक्षा वेगळे दिसतात.

Altroz ​​आणि Nexon च्या डार्क एडिशन

Tata Tata Safari ही कंपनीच्या डार्क एडिशनची लेटेस्ट एंट्री आहे. यापूर्वी, कंपनीने Altroz, Nexon, Nexon EV आणि Harrier च्या डार्क एडिशन लॉन्च केल्या आहेत. टाटाला आशा आहे की डार्क एडिशनच्या आधीच्या वाहनांप्रमाणे याला देखाल चांगला प्रतिसाद मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT