AI Safeguards White House eSakal
विज्ञान-तंत्र

AI Safeguards : 'एआय'चा धोका कमी करण्यासाठी प्रमुख टेक कंपन्यांचा पुढाकार; व्हाईट हाऊससोबत केला करार

यामध्ये गुगल, अमेझॉन, मेटा, ओपन एआय अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

Sudesh

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे गंभीर दुष्परिणाम भविष्यात उद्भवू शकतात हे आता जवळपास सर्वांनीच मान्य केलं आहे. त्यामुळेच, असे धोके कमी करण्यासाठी प्रमुख टेक कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत एक करार केला आहे. यामध्ये गुगल, ओपन एआय, मेटा आणि अशाच मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

यावेळी एआय संबंधित धोक्यांवर उपाययोजना करण्यासाठी नवीन गाईडलाईन्स तयार करण्यासंबंधी चर्चा झाली. यासाठी सर्व प्रमुख टेक कंपन्यांनी सहमती दर्शवली. यात खबरदारीचे उपाय म्हणून एआयच्या सुरक्षिततेची चाचणी करणे आणि त्यांचे निकाल सार्वजनिक करणे याचा समावेश आहे.

अमेझॉन, अँथ्रोपिक, मेटा, गुगल, इन्फ्लेक्शन, ओपन एआय या कंपन्यांनी व्हाईट हाऊससोबत हा करार केला आहे. ओपन एआय कंपनीने गेल्या वर्षी आपला चॅटजीपीटी हा चॅटबॉट लाँच केला होता. त्यानंतर गुगलनेही आपलं एआय समोर आणलं होतं.

काय आहे करार?

या कराराचा भाग म्हणून, कंपन्या आपलं कोणतंही नवीन एआय मॉडेल लाँच करण्यापूर्वी त्याची इंटर्नल आणि एक्स्टर्नल सिक्युरिटी टेस्ट करणार आहेत. यामुळे लोक वॉटरमार्क वापरून एआय शोधण्यात सक्षम आहेत, आणि एआयची क्षमता आणि मर्यादा सार्वजनिकपणे उपलब्ध आहेत हे सुनिश्चित होईल. तसेच पक्षपात, भेदभाव आणि गोपनीयतेवर हल्ला करणे अशा जोखमींबाबत देखील या कंपन्या संशोधन करतील. (AI Safeguards White House)

जबाबदारी गरजेची

"आज आम्ही दिलेलं वचन हे वास्तविक आणि ठोस आहे. एआय हे जगभरातील लोकांचं जीवन बदलणार आहे. यामुळेच एआयला योग्य जबाबदारीने आणि सुरक्षितपणे डिझाईन करणे गरजेचं आहे. इथं उपस्थित असलेले लोक यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत." असं मत बायडेन यांनी व्यक्त केलं. ते व्हाईट हाऊसमधील बैठकीनंतर बोलत होते.

"एआय हे लोकांच्या फायद्यासाठी असायला हवं. यासाठीच सर्व प्रमुख कंपन्यांनी जबाबदारी वाटून घेणं गरजेचं आहे. नवनवीन एआय मॉडेल तयार करताना कंपन्यांनी पारदर्शक असायला हवं. तसंच, कंपन्यांनी सरकार, उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आमि नागरी समाजासोबत मिळून काम करायला हवं", असं मत मेटाचे ग्लोबल अफेअर्स प्रेसिडेंट निक क्लेग यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT