Smartphone Unlock Esakal
विज्ञान-तंत्र

Tech Hacks : पासवर्ड विसरल्यामुळे फोन झालाय लॉक? चिंता सोडा, असा करता येईल क्षणात अनलॉक

लॉक झालेला फोन पुन्हा वापरण्यासाठी आधी तुम्हाला तो रिसेट करावा लागेल.

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही तुमच्या अँड्रॉईड फोनचा पासवर्ड विसरलात, तर तुम्हाला काही वेळा वेगवेगळे पासवर्ड ट्राय करण्याची संधी मिळते. मात्र, हे सगळेच पासवर्ड चुकले, तर तुमचा फोन लॉक होऊन जातो. अशा प्रकारे लॉक झालेला फोन अनलॉक करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

अशा प्रकारे फोन अनलॉक करणे शक्य आहे. मात्र, त्यात एक गोम आहे. अनलॉक केल्यानंतर फोनमधील तुमचा डेटा मात्र तुम्हाला गमवावा लागेल. डेटा जाण्याची भीती नसेल, तर अनलॉक करून हा फोन तुम्ही अगदी नव्याप्रमाणे वापरू शकाल. हे कसं करायचं (How to unlock smartphone without password) जाणून घेऊया.

फॅक्टरी रिसेट हा पर्याय

लॉक झालेला फोन (Smartphone tips) पुन्हा वापरण्यासाठी आधी तुम्हाला तो रिसेट करावा लागेल. यासाठी सर्वात आधी तुम्हाला हा फोन बंद करावा लागेल. यानंतर काही वेळ थांबून पुन्हा पॉवर आणि व्हॉल्यूम डाऊन बटन एकत्र दाबावे लागेल. असे केल्यामुळे फोन रिकव्हरी मोडमध्ये सुरू होईल.

याठिकाणी तुम्हाला फॅक्टरी रिसेट हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर सर्व डेटा हटवण्यासाठी 'वाईप कॅशे' हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर काही वेळातच तुमचा फोन पुन्हा सुरू होईल, आणि कोणत्याही पासवर्डशिवाय तुम्ही तो उघडून वापरू शकाल.

डेटा होणार गायब

फॅक्टरी रिसेट केल्यानंतर तुमच्या फोनमधील सर्व डेटा डिलीट होईल. तुमच्या गुगल अकाऊंटला जर फोनमधील डेटाचा बॅकअप असेल, तर नक्कीच हा डेटा तुम्हाला परत मिळेल. अर्थात, यासाठी तुम्हाला गुगलचा पासवर्ड लक्षात असावा लागेल.

दूरूनही करता येईल रिसेट

जर तुमचा फोन (Smartphone Hacks) तुमच्या जवळ नसेल, तर अँड्रॉईडच्या 'फाईंड माय डिव्हाईस' या फीचरचा वापर करूनही तुम्ही तो रिसेट करू शकता. यासाठी तुम्हाला अँड्रॉईडच्या android.com/find या वेबसाईटवर जावे लागेल. त्याठिकाणी गुगल अकाउंटने लॉग इन करावे लागेल. यानंतर स्क्रीनवर त्या अकाउंटशी लिंक असलेले सर्व डिव्हाईस दिसतील. यामधून तुमचा फोन निवडून इरेज डिव्हाईस हा पर्याय निवडा. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोन रिसेट करू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT