Apple iphone  esakal
विज्ञान-तंत्र

Tech News : ॲपलमुळे भारताला फायदा तर चीनला बसणार मोठा धक्का!

ॲपल एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादनही भारतात सुरू करण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

अमेरिकन कंपनी ॲपल आता पुन्हा चीनला धक्का देण्याची तयारीत आहे. अलीकडेच कंपनीने चीनमध्ये सुरू असलेलं आयफोनचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. येत्या काळात हे उत्पादन भारतात सुरू करणार असल्याचं कंपनीने ठरवलं होतं.पण आता एका रिपोर्टनुसार कंपनी त्यांच्या एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादनही भारतात सुरू करण्याची शक्यता आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ॲपल कंपनीने एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचं बहुतांश उत्पादन भारतात हलवण्याची तयारी केली आहे. तसेच भारतात आयफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉन कंपनी हे बीट्स हेडफोन तयार करण्याच्या तयारीत असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. Sci-Tech

एअरपॉड्सचं उत्पादन होण्याची शक्यता

यासोबतच एअरपॉड्सची निर्मितीही करण्यात येणार असल्याची शक्यता या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. खरं तर भारतासाठी ही मोठी सकारात्मक बाजू असेल. यातून भारत जागतिक पुरवठा साखळीचा मुख्य घटक म्हणून उदयाला येण्याची शक्यता निर्माण होईल.

या रिपोर्टनुसार या रिपोर्टनुसार ॲपलचे हे एअरपॉड्स चीन आणि व्हिएतनाममध्ये उत्पादित केले जातात. लक्सशेअर प्रिसिजन इंडस्ट्री या वायरलेस एअरपॉड्सच्या निर्मितीचं काम करते. पण फॉक्सकॉनने ही कमान आपल्या खांद्यावर घेतली असली तरी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.ॲपलने 2017 मध्ये भारतात सप्लायर विस्ट्रॉन सोबत मिळून आयफोनचं उत्पादन सुरू केलं होतं. कंपनीची नवीन आयफोन 14 सीरीज देखील भारतातच तयार केली जाईल.यापूर्वीही कंपनीने भारतात उत्पादन करण्याचा विचार केला होता. आता मात्र कंपनी भारताला उत्पादन बेस बनविण्याचं काम करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतात तयार होणारी उत्पादने युरोपसह अन्य बाजारपेठांमध्येही निर्यात करण्यात येतील. 

चीनला मात्र धक्का बसणार

कंपनीच्या या हालचालीमुळे चीनला धक्का बसणार असल्याचं तूर्तास तरी दिसतं आहे. जागतिक पुरवठा साखळीत चीन हा मोठा प्लेयर आहे. पण सततचं लॉकडाऊन, त्यात भरीस भर म्हणून अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचा फायदा भारताला होताना दिसतोय. पलचे हे एअरपॉड्स चीन आणि व्हिएतनाममध्ये उत्पादित केले जातात. लक्सशेअर प्रिसिजन इंडस्ट्री या वायरलेस एअरपॉड्सच्या निर्मितीचं काम करते. पण फॉक्सकॉनने ही कमान आपल्या खांद्यावर घेतली असली तरी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

ॲपलने 2017 मध्ये भारतात सप्लायर विस्ट्रॉन सोबत मिळून आयफोनचं उत्पादन सुरू केलं होतं. कंपनीची नवीन आयफोन 14 सीरीज देखील भारतातच तयार केली जाईल.यापूर्वीही कंपनीने भारतात उत्पादन करण्याचा विचार केला होता. आता मात्र कंपनी भारताला उत्पादन बेस बनविण्याचं काम करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतात तयार होणारी उत्पादने युरोपसह अन्य बाजारपेठांमध्येही निर्यात करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT