Technology News esakal
विज्ञान-तंत्र

Technology News : Hero Super Splendor XTEC लॉन्च, जबरदस्त मायलेज आणि फोनशी करता येणार कनेक्ट

Hero MotoCorp ने आपल्या बाईकवेड्या ग्राहकांसाठी नवी Hero Super Splendor XTEC मोटरसायकल लाँच केली

सकाळ डिजिटल टीम

Technology News : Hero MotoCorp ने आपल्या बाईकवेड्या ग्राहकांसाठी नवी Hero Super Splendor XTEC मोटरसायकल लाँच केली आहे. कंपनीने हीरो बाईक बऱ्याच स्टाइलिंग अपडेट्स आणि प्रीमियम कनेक्टिव्हिटी फीचर्ससह लॉन्च केलीय. Hero MotoCorp च्या या नव्या बाईकची किंमत काय? त्यात कोणकोणते फीचर्स आहेत यासगळ्याची सविस्तर माहिती पाहूया...

Hero Super Splendor XTEC ची भारतात किंमत..

कंपनीने ही हीरो मोटरसायकल ग्राहकांसाठी दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. या बाईकच्या ड्रम ब्रेक ऑप्शनची किंमत 83 हजार 368 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली), तर डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 87 हजार 268 रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली).

आपले तरुण ग्राहक लक्षात घेऊन Hero Super Splendor XTEC अद्ययावत करण्यात आल्याचा दावा कंपनीने केलाय. या नवीन बाईकमध्ये कंपनीने हाय इंटेन्सिटी पोझिशनिंग लॅम्पसह एलईडी हेडलॅम्प, तसेच कमी इंधन इंडिकेटरसह पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, सर्व्हिस रिमाइंडर आणि बाईकमध्ये काही बिघाड असल्यास त्यासाठी इंडिकेटरही दिले आहेत.

या नव्या हिरो मोटरसायकलमध्ये कंपनीने कॉल आणि एसएमएस अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचं फीचर देखील दिलंय. 125 सीसी सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या कम्युटर बाईकमध्ये ड्युअल टोन स्ट्राइप देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे या बाईकचे डिझाईन जरा जास्तच चांगले दिसत आहे. याशिवाय या बाइकला यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन चार्जिंग करू शकता.

हिरो सुपर स्प्लेंडर XTEC इंजिन डिटेल्स

125 cc BS6 इंजिनसह येणारी, ही बाईक 68kmpl चा मायलेज देईल, तसेच या बाईकचं इंजिन 7500rpm वर 10.7bhp पॉवर आणि 6000rpm वर 10.6Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT