Technology news in Marathi Geekbench Samsung galaxy note 8 have 6 GB RAM 
विज्ञान-तंत्र

'सॅमसंग' आणणार 6 जीबी रॅमचा मोबाईल

वृत्तसंस्था

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये तब्बल 6 जीबी 'रॅम' असेल, असे समजते आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची चाचणी घेणाऱया Geekbench या प्लॅटफॉर्मवर तशी माहिती मिळते आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये एक्झोनस8895 मोबाईल प्रोसेसर आणि 6 जीबी 'रॅम' आहे, असे प्लॅटफॉर्मवर चाचणीसाठी दाखल झालेल्या हँडसेटवरून दिसते आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये अँड्रॉईडची 7.1.1 ही आवृत्ती असेल. Geekbench वरील माहितीचे तपशील Telefoon.nl या वेबसाईटवर प्रकाशित झाले आहेत. त्यामधील माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मोबाईल हँडसेट 6.3 इंचाचा असेल.

आधीच्या माहितीनुसार, मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आहे. 3,000 मिली अँप अवर (mHA) इतकी बॅटरीची क्षमता आहे. मोबाईलमध्ये 64 जीबी इंटर्नल स्टोअरेज असेल. याशिवाय, वायरलेस चार्जिंगची सुविधा मोबाईलमध्ये आहे. 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या मोबाईलमध्ये आहे. युरोपियन बाजारपेठेत मोबाईलची किंमत 1000 युरो (सुमारे 75 हजार रूपये) असणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत भयानक पाऊस; २४ तासांत ५० गावांचा संपर्क तुटला

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT