best internet browser for privacy Esakal
विज्ञान-तंत्र

क्रोम ब्राउझरला कंटाळलात? Privacy ची वाटते चिंता? मग आजच डाऊनलोड करा हे अॅप

जर तुम्ही क्रोम ब्राउझिंगला Browsing कंटाळला असाल किंवा तुम्हाला प्रायव्हसीची चिंता वाटत असेल तसंच तुम्हाला काही प्रायव्हेट माहिती सर्च करायची असेल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही

Kirti Wadkar

अलिकडे स्मार्टफोनमध्येच अनेकजन वेब ब्राउझिंग Web Browsing करत असतात. वेब ब्राउझिंगसाठी मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनमध्ये गुगुल क्रोमचा वापर केला जातो. वेब ब्राउझिंगमध्ये गुगल क्रोम सध्या नंबर १ वर आहे. Technology News Social Media Marathi Know about this app to maintain privacy

कोणत्याही स्मार्टफोन Smartphone किंवा डिव्हाइसमध्ये क्रोम स्मूद चालतं. मात्र गुगल क्रोमचा एक तोटा म्हणजे तुमचा डेटा गुगलकडे स्टोअर राहतो. प्रायव्हसीच्या बाबतीत गुगल सर्च आणि क्रोम मात्र काहीसं मागे आहे.

गुगलची कमाई ही जाहिरातींवर अवलंबून असल्याने गुगल वापरकर्त्यांचा डेटा सेव्ह करत असते. तुम्ही कोणत्या वेब साइट्सना भेट देता काय सर्च करता हे सर्च इंजिनमध्ये Search Engine स्टोअर राहतं.

जर तुम्ही क्रोम ब्राउझिंगला Browsing कंटाळला असाल किंवा तुम्हाला प्रायव्हसीची चिंता वाटत असेल तसंच तुम्हाला काही प्रायव्हेट माहिती सर्च करायची असेल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण आम्ही तुम्हाला एका एक असा पर्याय सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या फोनमध्ये फ्रिमध्ये आणि सहज डाऊनलोड करू शकता.

DuckDuckGo प्रायव्हसी ब्राउझर

DuckDuckGo हे एका प्रकारचं ब्राउझिंग अॅप आहे. हे अॅप तुम्ही स्मार्टफोनमध्ये सहज डाउनलोड करू शकता. या ब्राउझरमध्ये मिनिमल इंटरफेल मिळत असून तुम्ही सहजपणे सर्च डेटा डिलिट करू शकता. या अॅपची खासियत म्हणजे या ब्राउझरचा वापर करत असताना कोणत्याही अॅड ट्रॅकरला तुमच्या अॅक्टिव्हिटी फॉलो करता येत नाहीत.

DuckDuckGoमध्ये वेब सर्च करत असताना तुमचा डेटा स्टोर केला जात नाही. डेटा स्टोअर होत नसल्याने गुगुलप्रमाणे सर्च करत असताना तुम्हाला इथं पर्सनलाइज्ड सजेशन मिळत नाही. तुम्ही काहीही सर्च करत असताना ब्राउजर तुम्हाला स्वत:हून कोणतेही सजेशन देत नाही जसे गुगल किंवा गुगल क्रोममध्ये दिले जातात.

हे देखिल वाचा-

खासगी माहिती राहील सुरक्षित

DuckDuckGo हे इतर सर्च इंजिनहून वेगळे आहे. हे कोणत्याही युजरला एखाद्या सर्च टर्मसाठी सारखेच रिझल्ट दाखवतात. शिवाय या ब्राउझिंग अॅपमध्ये इतरही अनेक सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फिचर्स आहेत. यामध्ये इन बिल्ट पासवर्ड मॅनेजर आणि Ad ब्लॉकर दिलं जातं. तसचं यात एक नेटिव्ह व्हिडीओ प्लेयर दिला जातो ज्यात ट्रॅकिंग कुकिज ब्लाॅक केल्या जातात.

हे ऍप २००८ सालामध्ये लॉन्च झालं असलं तरी सुरुवातील या अॅपचा वापर जास्त युजर्स करत नव्हते. मात्र हळूहळू युजर्सचे आकडे वाढू लागले. इंडोनेशिया, कॅनडा, न्यूझिलँड, सिंगापूर आणि युके या देशांमध्ये या ब्राउझरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

अशा प्रकारे सुरक्षित ब्राउझिंग करण्यासाठी तुम्ही या नव्या सर्च इंजिनचा उपयोग करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT