Technology News  esakal
विज्ञान-तंत्र

Technology News : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी TVS घेऊन येत आहे नवीन बाईक, इंजिन असेल मजबूत

TVS मोटर कंपनी बाइक सेगमेंटमध्ये 600cc ते 750cc इंजिन बाइक्स आणण्याच्या तयारीत

सकाळ डिजिटल टीम

Technology News : TVS मोटर कंपनी बाइक सेगमेंटमध्ये 600cc ते 750cc इंजिन बाइक्स आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी ट्विन-सिलेंडर सेटअपसह इंजिन देणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 650cc इंजिन असलेली नवीन TVS बाईक 47bhp पॉवर आणि 52Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.

नवी TVS बाईक यूकेच्या नॉर्टन मोटरसायकल कंपनीच्या सहकार्याने विकसित केली जात आहे. ही बाईक रॉयल एनफिल्डच्या 650cc बाईकला टक्कर देईल. या बाईकची नावं इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 अशी आहे.

TVS ची सर्वात महागडी बाईक

TVS ची ही 650cc बाईक कंपनीची सर्वात महागडी बाईक असेल. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या बाईकवर काम सुरू केलंय. पण, कंपनीने या नव्या बाईकबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती शेअर केलेली नाही. येत्या काळात याबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

TVS ने नवीन Ronin मॉडेल सादर केले आहेत

गेल्या आठवड्यात, TVS ने गोव्यात TVS MotoSoul 2023 हा बाइकिंग महोत्सव आयोजित केला होता. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात रोनिन प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या 4 बाइक्सचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये TVS Ronin Agonda, TVS Ronin Musashi, TVS Ronin SCR या बाईकचा समावेश होता.

स्पेशल कस्टम TVS Ronin SCR बद्दल सांगायचे तर, ही एक स्क्रॅम्बलर बाईक आहे ज्यामध्ये सस्पेन्शन स्पेसर आणि रेग्युलर मॉडेलपेक्षा जास्त ग्राउंड क्लीयरन्स आहे. सेमी-नॉबी शिन्को टायर्स, वायर-स्पोक व्हील असलेली ही बाइक TVS रोनिनपेक्षा वेगळी ठरते. या बाईकमध्ये हाय-माउंट एक्झॉस्ट सिस्टम देखील मिळते.

TVS Ronin SCR चे फीचर्स

रोनिन एससीआर ट्विन-पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज आहे. इतर काही खास हायलाइट्समध्ये ट्वीड एलईडी हेडलॅम्प, जास्तीची फ्रंट बीक, नवीन बॉडीवर्क आणि नवीन सिंगल सीट यांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, कंपनीची सध्या TVS Ronin SCR उत्पादनात ठेवण्याची कोणतीही योजना नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT