Netflix vs Amazon Prime Video google
विज्ञान-तंत्र

OTT आता फ्री मध्ये बघा तुमची आवडती वेब सिरीज, नेटफ्लिक्स सब्स्क्रिप्शनची गरज नाही

गेल्या दोन-तीन वर्षात भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली

सकाळ डिजिटल टीम

Technology Tips : गेल्या दोन-तीन वर्षात भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खासकरून करोना व्हायरस महामारीनंतर या प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढला आहे. परंतु, या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी तुम्हाला महिन्याला शेकडो रुपये खर्च करावे लागतात. भारतात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, झी५, सोनी लिव्ह, डिज्नी+ हॉटस्टारसह अनेक पेड ओटीटी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण आता पैसे न भरता तुम्ही मोफत चित्रपट, सीरिजचा आनंद घेऊ शकता. कसा काय?

तर मुकेश अंबानीच्या रिलायन्स जिओ सारख्या दूरसंचार कंपन्या, याशिवाय एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया उर्फ ​​​​व्ही सारख्या कंपन्या त्यांच्या युजर्सच्या सोयी लक्षात घेऊन अशा अनेक ऑफर देत असतात. यात तुम्हाला केवळ डेटा आणि इतर फायदेच नाहीत तर OTT चे ऑप्शन देखील उपलब्ध होतात. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तुम्हाला फक्त एक रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला वेगळं नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन घ्यायची गरज लागणार नाही.

जिओ 399 प्लॅन

या प्लॅनमध्ये 75 जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर प्रति जीबी 10 रुपये शुल्क आकारले जाते. पण यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनसोबत मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन आणि Netflix मोबाईल प्लॅन उपलब्ध आहेत.

जिओचा 599 प्लॅन

599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 100 GB हायस्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस फ्री मिळतात. हा एक फॅमिली प्लॅन आहे यात कंपनी अतिरिक्त जिओ सिम देत आहे. हा प्लान तुम्हाला Amazon Prime सोबत Netflix चा फायदा देखील देईल.

एअरटेल 1199 योजना

या प्लॅनमध्ये, कंपनी तुम्हाला दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग देते. हा पोस्टपेड प्लान असून यात 150 GB डेटा रोलओव्हर मिळतो. या प्लॅनसह कंपनी डिस्ने प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शन देते.

टीप : एकंदरीत, रिलायन्स जिओच्या नेटफ्लिक्स ऑफरिंग प्लॅनची ​​किंमत एअरटेलच्या तुलनेत खूपच कमी आहे. Vi कडे सध्या असा कोणताही प्लान नाही ज्यामध्ये Netflix फ्री मध्ये बघता येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT