telegram Google
विज्ञान-तंत्र

टेलिग्राम व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकणार? ओलांडला 1 अब्ज डाऊनलोडचा टप्पा

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रिय मेसेजिंग सेवा टेलीग्रामने (Telegram) गुगल प्ले स्टोअरवर एक अब्ज डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. जगातील सर्वात मोठे मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपसाठी (WhatsApp) हा मोठा काळजीचा विषय बनला आहे. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने यावर्षी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्रायव्हीसी फीचर देखील आणले आहे. त्यासोबतच काही आठवड्यांपूर्वी, व्हॉट्सअ‍ॅप काही तासांसाठी डाऊन झालं होतं ज्यानंतर अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

टेलिग्राम मेसेजिंग सर्व्हिस भारतात व्हॉट्सअ‍ॅपइतकी लोकप्रिय नाही, पण युवा वर्गात याचे मोठ्या प्रमाणात वापरकर्ते आहेत. बऱ्याचदा बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सारखे गेम खेळण्यासाठी, किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरीयल शेयर करण्यासाठी टेलिग्राम मोठ्या प्रमाणात वापरले जाते. दरम्यान सध्या टेलिग्रामची लोकप्रियता वेगाने वाढत आहे, स्टॅटिस्टाच्या रिपोर्टनुसार, टेलिग्राम अ‍ॅपला मार्च आणि एप्रिल 2021 मध्ये अनुक्रमे 32 मिलीयन आणि 26 मिलीयन इंस्टॉल्स मिळाले आहेत

टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांच्या मते, फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप अलीकडेच सहा तासांहून अधिक काळ बंद होते, ज्यामुळे टेलिग्रामला फायदा झाला. टेलिग्राम स्वतःला स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी नवे मार्ग शोधण्याचे काम करत आहे आणि टेलिग्रामचे जवळजवळ 500 मिलीयन अ‍ॅक्टीव वापरकर्ते आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, या टेलिग्रामला सोमवारी आउटेजचा खूप फायदा झाला. याबद्दल बोलताना पावेल दुरोव म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर 70 मिलीयन पेक्षा अधिक वापरकर्त्यांनी टेलिग्राम डाउनलोड केले. व्हॉट्सअ‍ॅप बंद होताच टेलिग्रामचा दैनंदिन वाढीचा दर प्रचंड वाढला. फक्त एका दिवसात 70 मिलीयनहून अधिक डाउनलोड हे एखाद्या स्वप्नासारखे आहे. हे सिद्ध करते की, टेलिग्राम व्हॉट्सअ‍ॅपला एक मजबूत पर्याय बनला आहे. व्हॉट्सअ‍ॅपनंतर लोक आता दुसऱ्या चांगल्या पर्यायासाठी टेलिग्रामवर अवलंबून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने घेतला पेट

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT