Serious Security Flaw in Telegram for Android, Users Urged to Update Immediately esakal
विज्ञान-तंत्र

Telegram Security Alert : तुमचं टेलीग्राम अकाऊंट हॅकर्सच्या निशाण्यावर; 30 सेकंदाचा व्हिडिओ अन् खेळ खल्लास; काय आहे नवा वायरस?

Telegram EvilVideo Exploit : टेलीग्राम वापरणाऱ्या Android युजर्सनी आता सावध राहायची गरज आहे. टेलीग्रामच्या अॅपमध्ये एक गंभीर त्रुटी आढळली आहे.या त्रुटीमुळे हॅकर्स तुम्हाला एखाद्या व्हिडीओसारखी दिसणारी फाईल पाठवू शकतात, पण प्रत्यक्षात ती वाईरस असते.

Saisimran Ghashi

Telegram Update : टेलीग्राम वापरणाऱ्या Android युजर्सनी आता सावध राहायची गरज आहे. टेलीग्रामच्या अॅपमध्ये एक गंभीर त्रुटी आढळली आहे, ज्याचा फायदा घेत हॅकर्स तुमच्या फोनमध्ये वाईरस घुसवू शकतात. त्याद्वारे तुमचा महत्वपूर्ण डेटा चोरीला जाऊ शकतो.

पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर या त्रुटीमुळे हॅकर्स तुम्हाला एखाद्या व्हिडीओसारखी दिसणारी फाईल पाठवू शकतात, पण प्रत्यक्षात ती वाईरस असते. तुम्ही Telegram चॅटमध्ये जेव्हा ही फाईल उघडाल, तेव्हा ती तुमच्या फोनमध्ये ऑटोमॅटिकली डाऊनलोड होते. म्हणजेच फक्त एक चॅट उघडण्याने तुमच्या फोनमध्ये वाईरस येऊ शकतो.

ईएसईटी या सायबरसिक्युरिटी संशोधन करणाऱ्या कंपनीने ही त्रुटी शोधून काढली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "ईव्हिलव्हिडीओ" (EvilVideo) नावाच्या या त्रुटीचा वापर करून हॅकर्स वाईरस तुमच्या फोनमध्ये घुसवू शकतात. या फाईल्स 30 सेकंदांच्या व्हिडीओसारख्या दिसतात पण त्या प्रत्यक्षात खतरनाक असतात.

ही त्रुटी जुन्या टेलीग्राम अॅपमध्ये आहे, विशेषतः व्हर्जन 10.14.5 पेक्षा आधीच्या व्हर्जनमध्ये. हॅकर्स टेलीग्राम एपीआय (अॅपमध्ये कंटेंट अपलोड करण्यासाठी वापरले जाणारे टूल) चा वापर करून या वाईरस फाईल्सना व्हिडीओचा देखावा देतात. जेव्हा तुम्ही हा "व्हिडीओ" प्ले करण्याचा प्रयत्न करता तेव्हा टेलीग्राम अॅप हे व्हिडीओ नाही प्ले होऊ शकत असे सांगते आणि दुसरे एप्प वापरण्याचा सल्ला देते. पण तुम्ही दुसरे अॅप वापरलात तर तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अडकता आणि तुमच्या फोनमध्ये खरा वाईरस येतो.

ईएसईटी ने 26 जून रोजी ही त्रुटी टेलीग्रामला दाखवून दिली. परंतु सुरुवातीला त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. शेवटी जुलै 4 रोजी पुन्हा या त्रुटीची माहिती दिल्यानंतर टेलीग्रामने त्वरित कारवाई केली आणि 11 जुलैला त्यांच्या अॅपचे नवीन व्हर्जन (10.14.5) रिलीज केली. या नवीन व्हर्जनमुळे आता टेलीग्राम वापरणे सुरक्षित झाले आहे.

तुम्ही तुमचे टेलीग्राम अॅप अपडेट करा आणि तुमच्या फोनला सुरक्षित ठेवा. अशा त्रुटींपासून बचण्यासाठी तुमच्या सर्व अॅप्स नेहमी अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT