Tesla in India eSakal
विज्ञान-तंत्र

Tesla in India : टाटाचं टेन्शन वाढलं! भारतात स्वस्तात इलेक्ट्रिक कार बनवणार टेस्ला; मोदी-मस्क भेटीनंतर पुन्हा चर्चा सुरू

भारतात यामुळे २० लाख रुपयांपर्यंत टेस्लाच्या गाड्या मिळू शकतात.

Sudesh

जगातील इलेक्ट्रिक कार्स बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी टेस्ला बऱ्याच काळापासून भारतात एंट्री करण्याच्या विचारात आहे. काही कारणास्तव वारंवार याबाबतच्या चर्चा पुढे जात नव्हत्या. आता पुन्हा एकदा टेस्लाकडून याबाबत चर्चेचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी टेस्लाचे मालक आणि सीईओ इलॉन मस्क यांनी मोदींची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सरकार आता टेस्लाच्या प्रस्तावावर विचार करण्याची शक्यता आहे.

भारतात उभारणार प्लांट

भारतात आपला प्रॉडक्शन प्लांट उभारून, देशातच टेस्ला कार्स तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे. यापूर्वी टेस्लाने याबाबत तयारी दाखवली नव्हती. त्यामुळे टेस्लाचा भारतात येण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळला होता. मात्र, आता भारतात निर्मिती करण्यासाठी टेस्ला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका वर्षाला ५ लाख इलेक्ट्रिक कार्स बनवता येतील एवढी मोठी फॅक्टरी उभारण्याचा टेल्साचा प्रस्ताव आहे. (Elon Musk Meets Modi)

किंमत असणार कमी

टेस्लाने आपल्या प्रस्तावात या इलेक्ट्रिक कार्सच्या किंमतीबाबत देखील माहिती दिली आहे. भारतासाठी ते परवडणाऱ्या दरामध्ये कारची निर्मिती करतील. अमेरिकेच्या तुलनेत तब्बल १५ लाख रुपये कमी किंमतीमध्ये भारतात या कार्स मिळू शकतील. त्यामुळे, भारतात टेस्लाच्या गाड्या २० लाख रुपयांपर्यंत मिळू शकतील असा अंदाज व्यक्त कऱण्यात येत आहे.

या चर्चांबाबत टेस्ला किंवा भारत सरकार या दोघांकडूनही अधिकृत माहिती मिळाली नाही. तरीही, टेस्लासोबत भारत सरकारचा करार यावेळी पूर्ण होऊ शकतो अशा चर्चा आहेत. यामुळे सध्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये येण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भारतीय कंपन्यांचं टेन्शन मात्र वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT