Tesla Cars Recalled eSakal
विज्ञान-तंत्र

Tesla Cars Recalled : टेस्लाच्या गाड्यांमध्ये आढळली जीवघेणी त्रुटी; कंपनीने 1,20,000 गाड्या मागवल्या परत

टेस्लाने अमेरिकेत गेल्याच आठवड्यात आपल्या 20 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या होत्या.

Sudesh

Tesla Cars Recalled : टेक जायंट इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला कंपनीला मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या मॉडेल एस आणि मॉडेल एक्स या गाड्यांमध्ये एक गंभीर त्रुटी समोर आली आहे. यामुळे टेस्लाने आपल्या सुमारे 1,20,000 गाड्या परत मागवल्या आहेत. रॉयटर्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी या गाड्यांचे दरवाजे एका त्रुटीमुळे आपोआप अनलॉक होत आहेत. त्यामुळे मोठी हानी होण्याचा धोका आहे. म्हणून कंपनीने आपल्या गाड्या परत मागवल्या आहेत. (Tesla Security Issue)

अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमनिस्ट्रेशनने (NHTSA) दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाने 2021-2023 या दरम्यान आलेल्या मॉडेल्ससाठी एक ओव्हर दि एअर सॉफ्टवेअर अपडेट जारी केला होता. मात्र हे सॉफ्टवेअर साईड-इम्पॅक्ट प्रोटेक्शनसाठी फेडरल सुरक्षा मानांकनांचे अनुपालन करत नाही.

टेस्लाने (Tesla) सांगितलं की सुरुवातीच्या क्रॅश टेस्ट दरम्यान क्रॅशने प्रभावित होत नसणाऱ्या भागावर प्रभाव पडल्यास एका केबिनचा दरवाजा उघडत असल्याचं दिसून आलं. सॉफ्टवेअर अपडेटमध्ये लॉकआउट फंक्शनॅलिटी फीचरच टाकायचं राहून गेल्याचं कंपनीच्या उशीरा लक्षात आलं. या त्रुटीमुळे अद्याप कोणाचा अपघात झाला आहे का, किंवा वॉरंटी क्लेम करण्यात आली आहे का याबाबत माहिती नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

गेल्याच आठवड्यात परत मागवल्या 20 लाख गाड्या

टेस्लाने अमेरिकेत गेल्याच आठवड्यात आपल्या 20 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या होत्या. ऑटोपायलट एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंस सिस्टीममध्ये नवीन सेफ्टी फीचर्स इन्स्टॉल करण्यासाठी या गाड्या परत मागवल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT