या दिवाळीत जर तुम्ही कमी बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा शोध कदाचित Redmi Note 9 वर संपू शकेल.
या दिवाळीत जर तुम्ही कमी बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन (Smart Phone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा शोध कदाचित Redmi Note 9 वर संपू शकेल. वास्तविक, Mi आपल्या Redmi Note 9 स्मार्टफोनवर Mi Exchange प्रोग्राम ऑफर करत आहे. या प्रोग्राम अंतर्गत ग्राहक जुने फोन एक्सचेंज करू शकतात आणि Redmi Note 9 खरेदी करू शकतात. तुम्हाला पूर्ण एक्सचेंज बोनसची रक्कम मिळाल्यास, तुम्ही Redmi Note 9 कमीत कमी 1499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Redmi Note 9 ची किंमत किती आहे आणि तुम्हाला ऑफर कशी मिळेल त्याबद्दल जाणून घ्या...
तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे Redmi Note 9 आणि त्याप्रमाणे किमतीही
Redmi Note 9 चा बेस मॉडेल म्हणजेच 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे आणि टॉप एंड 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. कंपनी या तिन्ही प्रकारांवर Mi Exchange ऑफर 10,500 रुपयांपर्यंत देत आहे. म्हणजेच तुमचा जुना फोन बदलून तुम्ही Redmi Note 9 वर 10,500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. ही ऑफर कंपनीच्या अधिकृत साइटवर उपलब्ध आहे. समजा, तुम्हाला जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 10,500 रुपयांचा पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाला तर Redmi Note 9 चा 4GB + 64GB व्हेरिएंट फक्त 1,499 रुपयांना, 4GB + 128GB व्हेरिएंट फक्त 2,499 रुपयांना आणि 6GB + 128GB व्हेरिएंट फक्त 2,499 रुपयांना खरेदी करता येईल. हे लक्षात घ्यावे, की एक्सचेंज बोनसची रक्कम जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल.
असा घ्या Mi Exchange सुविधेचा लाभ
फोन खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम 'Buy Now' वर क्लिक करा.
तुमचा पसंतीचा प्रकार निवडा, खाली स्क्रोल करा आणि 'बाय विथ एक्सचेंज' पर्यायावर क्लिक करा.
पिनकोड तपशील प्रविष्ट करा.
तुम्हाला एक्सचेंज करायचे असलेल्या जुन्या फोनचे मॉडेल निवडा
IMEI तपशील प्रविष्ट करा.
Agree and Apply Credit Now सिलेक्ट करा आणि तुमच्या जुन्या फोनचे बेस्ट व्हॅल्यू जाणून घ्या.
खरेदी केल्यावर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह जुना फोन घेण्यासाठी आणि नवीन फोन देण्यासाठी घरी येईल.
काय खास आहे Redmi Note 9 स्मार्टफोनमध्ये...
अधिकृत साईटवर दिलेल्या माहितीनुसार, फोन Aqua Green, Artic White, Pebble Grey, Scarlet Red आणि Shadow Black या 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.53-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण मिळते. डिस्प्लेवर अँटी ऑइल आणि अँटी फिंगरप्रिंट प्रोटेक्टिव्ह कोटिंग आहे. फोन MIUI 11 + Android 10 OS वर काम करतो आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरने सज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा AI क्वाड कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा AI सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5020mAh बॅटरी आहे, जी 9W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. बॉक्समध्ये 22.5W चा फास्ट चार्जर उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.